पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र ४७ व्याख्यान झाले व छोटे कॉटन हे अध्यक्ष होते. समेत बखेडा होईल म्हणून तिकिटे देऊनच लोकाना आत सोडले होते. पटेल व केळकर हे गेले होते. टिळकाकरिता तिकिट मागितले नाही व टिळक गेले नाहीत. (९२) अहवाल लंडन २ जुलै १९१९ हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये लॉर्ड कर्झन यांचे सूचनेवरून बिलाची सिलेक्ट कमिटी नेमली गेली. कर्झनसाहेब अगदी औपचारिक बोलले. संडे अॅड स्कूलमध्ये टिळकांचे ता. २७ रोजी भाषण झाले. पटेल यानी आपले ऑफिस ब्रिटिश काँग्रेस कमिटीच्या ऑफिसात अखेर नेऊन बसविले. सिलेक्ट कमिटीवर स्पूर हे एकटेच मजूरपक्षातर्फे आहेत. लॉर्ड सिडनहॅम हेहि आहेत. साऊथपोर्ट येथील सभेत राजकारणात संपांचा उपयोग करावा असे ठरले. (९३) बातमीपत लंडन ३ जुलाई १९१९ लंडनचा या आठवड्यातील मुख्य विषय म्हटला म्हणजे तह जर्मनी तद्दावर सही करणार ही गोष्ट निश्चितप्राय होती. तथापि अखेरपर्यंत काय होते. काय नाही याविषयी इंग्रजाना धागधुग वाटे. शेवटी शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता तहावर सह्या झाल्याची बातमी येथे साडेतीन वाजता प्रसिद्ध झाली त्या- बरोबर विजयोत्सव सुरू झाला. सरकारी बडा उत्सव अजून पुढे व्हावयाचाच आहे पण लोकानी छोटा उत्सव ताबडतोब उरकून घेतला. शहरचा मुख्य चव्हाटा ट्राफलगर स्क्वेअर या ठिकाणी हजारो रिकामटेकडे लोक पॅरिसहून बातमी येण्याची वाट पहात आगाऊच बसले होते. त्यांतच दुकाने कचेऱ्या बंद होऊन बाहेर पड- लेल्या लोकांची भर पडली. गाड्या व मोटारी यांची वाहतुक अशक्यच झाली. चोहोकडे तोफाचे प्रचंड आवाज व त्यांतच फटाक्यांचे बार होऊ लागले. वर आकाशात विमाने घारीसारखी फिरू लागली. लहान मोठी निशाणे डोक्यातील टोप्यापासून तो उंच इमारतीच्या शिखरापर्यंत लागली. इतर सर्व बाजार बंद पडून निशाणांची खरेदी-विक्री हाच मुख्य व्यापार होऊन बसला. भररस्त्यावर स्त्रीपुरुष उड्या मारू लागले. एखाद्या जत्रेतल्याप्रमाणे नाच गाणे बजावणे खेळ तमाशे मद्यपान व भामटेगिरी याना ऊत आला. हौशी लोकांच्या थव्यानी राज- वाडा वेढून गेला व राजाराणी सजात येऊन लोकाना दर्शन देऊ लागलो. रात्री अनेक विमानानी हजारो फुटावरून लखलखीत दीपकिरण पाडून राजवाडा पुष्कळ वेळ पाजळून धरला होता. इंग्लंडच्या ऐहिक वैभवाचा कळस झाला असे चर्चिल साहेबानी नुकतेच बोलून दाखविले ते खरेच आहे. जगातल्या सांधी कोपऱ्यात लक्ष्मी अजून दडून बसली असेल तिला तेथून खेचून आपल्या देशात आणण्यास