पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ ध्येय मनात ठेवून जेणेकरून ही एक पायरी जनता वर चढेल, आणि त्या मार्गाचा उघड अंगिकार करून ते ध्येय अमलात आणण्यास आपणास मदत करील व आपल्या पाठोपाठ येईल अशा रीतीने वागणे हे खरे शहाणपणाचे होय, असे जगाचा अनुभव व इतिहास मुत्सद्याना शिकवतो ही गोष्ट टिळकानी आपल्या तरुण श्रोत्यास नीट समजावून सांगितली. तात्विक विचारसरणीनेच ठरवावयास आपण बसलो तर ध्येये काय अनंत आहेत; पण कोणाहि देशभक्ताची तारीफ केवळ ध्येयावरून जग करीत नसून त्या ध्येयाकरिता तो स्वतः किती उद्योग व स्वार्थत्याग करितो यावरून करीत असते. देशाप्रीत्यर्थ म्हणून राजकीय, धार्मिक, सामाजिक, औद्योगिक यापैकी वाटेल ते ध्येय आपल्या स्वभावास व परिस्थितीस अनुकूल म्हणून मनुष्याने पत्करले तरी त्याचे श्रेय सारखेच आहे. पण आपल्या आवडत्या ध्येयाकरिता आपले आयुष्य खर्च करण्यास तयार होणे व आपल्या कार्यक्रमात प्राप्त होणारी दुःखे विनतक्रार सोसणे यातच खरा पुरुषार्थ आहे, एरव्ही ध्येयाची कोरडी चर्चा करीत बसणे हा नुसता चावटपणा होय ! आजची ध्येये व मार्ग कोणास चुकीचे वाटले तर त्याने नवीन शोधून काढावे. नव्या पिढीच्या यशस्वी उद्योगाने आपल्या ज्या चुका उघडकीस येतील त्या कबूल करण्यास जुन्या पिढीच्या पुढान्यास केव्हाहि आनंदच वाटेल. एकाच आयुष्यक्रमात एक ध्येय सोडून दुसरे अधिक बरे वाटले तर तेहि पत्करण्यास हरकत नाही. मात्र तात्त्विक ध्येयाच्या वायफळ चिकित्सेने डोके न पिकविता, मध्यम वय प्रवेशाच्या वेळी योग्य वाटेल ते ध्येय पसंत करावे, आणि मग त्या ध्येया- करिता जन्मभर स्वतःस वाहून घेऊन कोणत्याही उद्योगाचे फळ देशाला वाहीन असा निश्चय मनाशी करून विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीतून बाहेर पडावे. विशेषतः ऑक्सफर्ड - केंब्रिजसारख्या पहिल्या प्रतीच्या विद्यालयात ठेवून, हजारो रुपये खर्चून, ज्या विद्यार्थ्यास आईबापानी किंवा पालकानी उत्तमातले उत्तम शिक्षण दिले त्यांच्यावर ही जबाबदारी विशेष आहे; वगैरे गोष्टींचा उपदेश टिळकानी श्रोत्यास केला. (९१) अहवाल लंडन २६ जून १९१९ कमिटी पुढील साक्षीची तयारी सुरू आहे. शिष्टमंडळांची एकी होत नाही. लॅन्सबरी वेजवूड यानी सर्वोना एकत्र बोलावले होते. साफ साफ बोलणी झाली. टिळक व बेझंटबाई यांची खाजगी भेट झाली. बाई मजूर परिषदेला साऊथपोर्ट येथे जात आहेत. तेथे विषय संपाचा आहे. हिंदुस्थानात त्या संपा- विरुद्ध बोलतात. तेव्हा साऊथपोर्ट येथे काय बोलतात ते पहावे. नेमस्तानी स्टेट सेक्रेटरीशी मिळून बिलाला संमति द्यावी अशाकरिता नॅशनल लिवरल क्लबमध्ये सभा झाली. पण माँटेग्यू व सिंह हे पॅरिसला गेल्यामुळे चार्लस रॉबर्ट्स यांचे