पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र (८८) एच. मेसन यांचे टिळकाना पत्र लंडन १६ जून १९१९ ४५ होरेशो बॉटमली यांचा 'पीपल्स लीग' हा दिवसेदिवस अधिक महत्त्व पावत आहे. त्याचा उद्देश ज्या देशात नोकरशाहीचा जुलूम माजला आहे त्यातील लोकाना स्वातंत्र्य मिळवून देण्याचा आहे. तरी आपल्या चळवळीसंबंधाची थोड- क्यात हकीकत संगतवार मजकडे लिहून पाठवावी. स्वतः मी हिंदुस्थान व ब्रह्म- देश येथे पाच वर्षे होतो आणि राष्ट्रसंघाचे यश तो हिंदुस्थानला कसे वागवितो याच्यावरच अवलंबून आहे असे मला वाटते. (८९) अहवाल लंडन १९ जून १९१९ तीन्ही शिष्टमंडळानी मिळून एकच मागणी करावी अशी खटपट जोराची सुरू आहे. ही गोष्ट बेझंटबाईना अर्धवट तरी पटली आहे. पटेल यांच्या लेखांचा शिरकाव 'इंडिया' पत्रात आता कोठे झाला. पण संपादक अजून दाद देत नाहीत. पत्र हाती न येईल तर दोनतीन महिन्यापुरते काँग्रेसचे म्हणून एक छोटेसे पत्र काढावे असा विचार आहे. टिळक व केळकर ऑक्सफर्ड येथे जाऊन आले. केंब्रिजप्रमाणेच तेथेहि भाषण झाले. ऑक्सफर्ड येथे यावेळी विद्यार्थी थोडे होते. यंदाचे हिंदी रँग्लर न्यू पूना कॉलेजचे शाहा हे आहेत. त्यांची गाठ पडली होती. सिलेक्ट कमिटीचे काम २६ जूनपासून सुरू होईल असे म्हणतात. (९०) बातमीपत्र लंडन १९ जून १९१९ पूर्वी ठरल्याप्रमाणे लो. टिळक मी व रा. जोशी गेल्या रविवारी ऑक्स- फर्ड येथे गेलो होतो. दोन प्रहरी शहर व काही प्रमुख कॉलेजे पाहून झाल्यावर रात्री आठ वाजता ' मजलसी' पुढे टिळकांचे व्याख्यान झाले. कैंब्रिजप्रमाणे येहि त्यानी ' विद्यार्थ्यांचा भावी आयुष्यक्रम' या विषयावर प्रथम सव्वा तास व मागून उत्तरादाखल भाषण केले. निरनिराळ्या प्रांतातील हिंदी विद्यार्थी, तसेच एक इंग्रज व एक अमेरिकन विद्यार्थी बोलले. केंब्रिजपेक्षा येथे अधिक जोराचा वाद झाला. सत्याग्रहाच्याहीपेक्षा खालच्या पायरीच्या सौम्यातील सौम्य अशा निवळ जनताधर्मापासून जालीमातील जालीमापर्यंत सर्व उपायांचे ताविक समर्थन करणारा एकना एक विद्यार्थी होताच. पण विद्यार्थिदशेतील ध्येये कितीही उज्ज्वल असली तरी पुढे छोट्यामोठ्या संसारात पडलेल्या विद्यार्थ्यांस येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी किती तरी दुस्तर असतात; याकरिता कोणत्याहि देशातील जनतेस त्या काळी पचेल व मानवेल असे, पण लोकमताच्या वरच्या एक पायरीचे, .