पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ केळकर — लॉर्ड सिडनहॅम व आम्ही हे सारखेच असे म्हणणे बरोबर नाही. कारण त्याना तुमचे बिल मुळातच नको. आम्हाला बिल हवे पण थोडे सुधारून हवे. द्विदलपद्धति काँग्रेसने हि मान्य केली आहे पण ती वरिष्ठ कारभारात लावावी खाली नको इतकेच काय ते आमचे म्हणणे. हेच लॉर्ड सिंह व्हाइसरायचे एक्झिक्युटिव्ह कौंसिलर होते आणि ते त्या कामाला योग्य ठरले. पण त्यांचेच खाते उद्या राखीव न ठेवता सोपीव केले तर त्या जबाबदारीला मात्र लॉर्ड सिंह हे एकदम अपात्र कसे ठरतात १ शेवटी लॉर्ड सिंह यानी हळूच असे दर्शविले की काही म्हणा पण यंदा हे बिल निकालात न निघाले तर ते फिरून पुढच्या वर्षी आणावे लागेल. आणि अवघ्या एका वर्षांत काय काय तरी उलथा पालथी होतात ! याचा अर्थ 'बिल असमाधानकारक असेल पण आहे तसे ते मान्य करा झाले, ' (८६ ) अहवाल लंडन १२ जून १९१९ बिलाचे दुसरे वाचन संपले. मूळ रिपोटीपेक्षाहि बिलात दिवाणांच्या जबाब- दारीचे मान कमी केले आहे. बिल जसे आहे तसेच जर नेमस्ताना मान्य तर त्यांचे शिष्टमंडळ आले तरी कशाला ? अर्थात् त्यांनाहि ते सुधारले पाहिजे असे म्हणावे लागणार. खापर्डे येऊन पोचले. बेझटबाई आल्या. टिळक त्यांच्या स्वाग- तार्थ स्टेशनावर गेले होते. काल काँग्रेसचे शिष्टमंडळ माँटेग्यू साहेबांच्या भेटीला गेले होते. बोलण्यात बरे दिसले, काँग्रेसने आपले म्हणणे मांडण्याचा त्याना विशेष राग येईल असे वाटत नाही. (८७) डॉ. हर्डीकर यांचे टिळकाना पत्र न्यूयॉर्क १३ जून १९१९ 'इंडियन लेबर यूनियन ऑफ अमेरिका' या नावाची एक संस्था नुकतीच स्थापण्यात आली असून न्यूयॉर्कमधील हिंदुमुसलमान कामकऱ्यांची एकी झाली आहे. प्रत्येक रविवारी सभा भरते. रोज रात्रौ या लोकाना इंग्रजी शिकविण्याकरिता आमच्या कचेरीत वर्ग भरतो. सोबत पाठविलेल्या पत्रकाच्या दहा हजार प्रती काढल्या आहेत. येथील काँग्रेसच्या प्रत्येक सभासदाला एकेक प्रत पाठवीत आहो. लंडनमध्ये हल्ली पुष्कळ हिंदी गृहस्थ आले आहेत असे समजते. तरी त्यापैकी इकडे कोणी येऊन जाणार नाहीत काय ? लालाजींची इच्छा पार्लमेंटरी कमिटीपुढे साक्ष देण्याची आहे. त्यानी तारा केल्या आहेत पण उत्तरे नाहीत.