पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ लॉर्ड सिंह - पुष्कळ लोकाना असेच म्हणताना मीहि ऐकले आहे. माझ्या मते या तक्रारीत फारसा अर्थ नाही. स्वतः मीच ते नियम बहुतेक केले. मला कोणी नक्की उदाहरणे सांगेल तर बरे होईल. पटेल कौन्सिलात प्रश्न विचारणे व ठराव मांडणे यासंबंधाने ग्राह्याग्राह्य ठरविण्याचा फार मोठा अधिकार नियमानी सरकारास दिला आहे. लॉर्ड सिंह — पण नियम कितीहि अघळपघळ केले तरी शेवटी या बाबतीत गव्हर्नर गव्हर्नर-जनरल याना निर्णयाधिकार द्यावाच लागतो. खापर्डे – तसेच कौन्सिलच्या निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवाराना अपात्र ठरविण्याविषयी नियमानी सरकारास फारच मोठे अधिकार दिले आहेत. खुद्द केळकरांचेच उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे. लॉर्ड सिंह - ते खरे. पण तशी उदाहरणे फारच थोडी दाखविता येतील. माँटेग्यू — द्विदलराज्यपद्धति काँग्रेसला मान्य नाही तर वरिष्ठ सरकारच्या कारभारात ती कॉंग्रेसला कशी चालते ? ती कॉंग्रेसने का मागितली ? खापर्डे : — द्विदलपद्धति राष्ट्रीय सभेला सर्वस्वी अमान्य होती असे म्हणता येत नाही. प्रथमपासून दिवाणी मुलकी खाती आणि लष्कर आरमार परराष्ट्रीय संबंध वगैरे खाती यात काँग्रेसने केव्हाही फरक मानला आहे. काँग्रेसचे म्हणणे इतकेच की द्विदलपद्धतीचे तच मान्य केले तरी हिंदुस्थानसरकारच्या कारभारात ती चालेल खाली नको. म्हणून ही आमची मागणी सुसंगत आहे. माँटेग्यू पण तूर्त प्रांतिक स्वातंत्र्य देणे शक्य नाही. यात हिंदी लोक अपात्र असा अर्थ नाही. म्हणणारे काहीहि म्हणोत पण प्रांतिक कारभारात पूर्ण स्वातंत्र्य देण्यापूर्वी काही खात्यांचा अधिकार लोकानी जबाबदारीने चांगला चालवून दाख- विला पाहिजे. एका बाजूला लॉर्ड सिडनहॅमसारखे लोक म्हणतात की प्रांतिक कार- भारात देखील एक काडीचाहि अधिक अधिकार देऊ नये आणि काँग्रेस तर पूर्ण प्रांतिक स्वातंत्र्य मागते ! मग आम्ही कोणाचे ऐकावे ? म्हणून दोहोच्या मधलाच मार्ग स्वीकारला व द्विदल पद्धतीची योजना केली. पटेल - याशिवाय तिसराहि एक मार्ग आहे असा की सुधारलेले पुढारलेले प्रांत पाहून त्यानाच तेवढे पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. इतर प्रांताना देऊ नये. पण काँग्रेसचे असे म्हणणे नाही हेहि मी लगेच सांगून टाकतो. आपण तिसरा मार्ग नाही असे म्हणाला म्हणून सहज सुचला तो सुचविला. माँटेग्यू — द्विदल पद्धति अव्यवहार्य आहे असे दिवाणसाहेबानाहि वाटते की काय ? दिवाण माधवराव - होय, मलाहि ती पद्धति गैर वाटते. संस्थानाच्या कार- भारात द्विदलपद्धति नाही आणि जातवार प्रतिनिधींची पद्धत न स्वीकारताहि सर्व जातींचा समावेश आमच्या कौन्सिलातून होऊ शकतो.