पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

88 लो० टिळकांचे चरित्र भाग ५ धसावे, असे सुचविण्यात आले आहे. बेझंटवाईच्या लीगने आमच्या लीगला चहाला बोलाविले होते. निरनिराळ्या डेप्युटेशनच्या लोकाना माँटेग्यू यानी जेवणास बोलाविले होते. गुरुवारी बिल पुढे आणले. आज त्याचे दुसरे वाचन होत आहे. हाऊस ऑफ लॉर्डसने दुसरे वाचन केले तर सिलेक्ट कमिटी नेमली जाईल. सिडनहॅम साहेब बहुधा विरुद्ध बोलतील. टिळक व केळकर ३१ तारखेस केंब्रिज येथे होते, मजलीसची सभा झाली. (८४) बातमीपत्र लंडन ५ जून १९१९ टिळक कालच ( ता. ४ जून रोजी ) कैंब्रिज येथे जाऊन आले. केंब्रिज येथे सुमारे ८०/९० हिंदी विद्यार्थी हिंदुस्थानच्या सर्व भागातून अभ्यासाकरिता आले आहेत. हिंदी मजलीस नावाची संस्था केंबीज येथे आज काही वर्षे अस्ति- त्वात असल्याचे केसरीचे वाचकास माहीत असेलच. या सभेत व्याख्याने वाद- विवाद मोकळ्या मनाने होतात. या सभेपुढे काल टिळकांचे व्याख्यान झाले. हिंदी विद्यार्थ्यांखेरीज काही थोडे युरोपियन विद्यार्थीहि मुद्दाम आले होते. देशाच्या सद्यःस्थितीचे वर्णन करून टिळकानी आपल्या तरुण श्रोत्यास असा रोखठोक प्रश्न केला की " तुम्ही उच्च प्रतीचे शिक्षण मिळवून व स्वतंत्रतेच्या हवेत पिकणारे विचार बरोबर घेऊन हिंदुस्थानात जाणार, पण केवळ स्वार्थसाधनपर न बसता देशकार्याला वाहून घ्यावयाचे असा निश्चय तुम्हापैकी कितीजणानी केला आहे ?" याला उत्तरे देताना काही विद्यार्थ्यांनी आपल्या पोरबुद्धीमुळे व अज्ञानामुळे बराच हंशा पिकविला. तथापि पुष्कळांच्या मनावर प्रश्नाचे खरे मर्म ठसून त्यानी आपण तुमच्या उपदेशाप्रमाणे खास बागणार आहो असे सांगितले. एका तरतरीत ब्राह्मण मुलाने त्याना आश्वासन दिले की मी सिव्हिल सर्विस परीक्षा पास होणार पण नोकरीत शिरणार नाही असा निश्चय तुमच्या उदाहरणावरून यापूर्वीच केला आहे. ईश्वर या मुलाला आपला निश्चय पाळण्यास सामर्थ्य देवो. कारण जाणून- बुजून स्वार्थत्याग कशाला म्हणतात याचे ते एक उदाहरण होईल. असो. लो० टिळक हे ऑक्सफर्ड येथील मजलसीच्या निमंत्रणावरून येत्या १५ तारखेस तेथे जातील. (८५) अहवाल लंडन १२ जून १९१९ ता. ११ जून १९१९ रोजी काँग्रेसचे शिष्टमंडळ माँटेग्यू साहेबांच्या भेटीला गेले. लॉर्ड सिंह सर विलियम ड्यूक चार्लस रॉबर्टस हेहि तेथे होते. काँग्रेसची आज्ञा माँटेग्यू साहेबांच्या योजनेत सुधारणा करावी व त्याहून अधिक मागावी अशी होती. माँटेग्यू ह्याना याचे वैमनस्य वाढले. काँग्रेसची मागणी आपल्या