पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र ३९ स्वीकारताना इतर मंत्रिमंडळीचे व मुख्य प्रधानांचे असे आश्वासन घेतले आहे की ' मी सुधारणांचे जे बिल आणीन ते तुम्ही मान्य केले पाहिजे. एरवी हिंदु- स्थानच्या कारभाराची मी जबाबदारी पत्करणार नाही.' माँटेग्युसाहेबांच्या पक्षाला हल्ली पार्लमेंटमध्ये भरभक्कम पाठबळ आहे व ते करतील ते आज होईल. अद्यापि संयुक्त मंत्रिमंडळाची पद्धत अंमलात असल्यामुळे विरोधी म्हणून जो पक्ष- Opposition--नावाला आहे तोहि स्नेहगर्भ असाच आहे. आज पार्लमेंटमध्ये तिसरा पक्ष असा मुळीच नाही. काही तिस्मारखान किंवा केवळ एकांडे शिले- दार आहेत ते रॉडिकल आहेत. रीस किंवा बेनेट ( टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक ) यासारखे काँझरव्हेटिव्ह आहेत पण त्यांच्या आंगी सामर्थ्य नाही. व रीससाहेबानी तर माँटेग्यु साहेबांचा पक्ष अगदी उघड उघड स्वीकारला आहे. मजूर पक्षच काय तो मंत्रिमंडळाचा प्रतिपक्ष. पण तो तर म्हणतो हिंदुस्थान चतकोर भाकरी का मागतो ? सगळीच एकदम का सागत नाही ? त्याना हा हा म्हणून उलट आम्हालाच संभाळून धरावे लागते व हिंदुस्थानची स्थिति अशी आहे असे सांगून सर्व होमरूल एकदम मागणे शक्य नाही असे समजून सांगावे लागते. तात्पर्य राष्ट्रीय सभेची मागणी केल्यास विलास धोका नाही एवढेच नव्हे तर डॉ. क्लार्क विनोदाने म्हणाले त्याप्रमाणे " लार्ड सिडेनहॅमच्या पक्षाला वाटेल त्याने जाऊन मिळावे. तुमच्या विरोधामुळे काही होत नाही. तुम्ही बिल हाणून पाडावयाचे म्हटले तरी पडणारे नाही. तुम्ही नको म्हणाला तरी माँटेग्यु साहेबानी योजलेल्या सुधारणा तुमच्या गळ्यात बांधिल्याशिवाय ते सोडणार नाहीत ! " हल्ली पार्लमेंटची स्थितीच अशी काही आहे की प्रधानमंडळ म्हणेल ते होईल. मात्र ही स्थिति फार दिवस टिकणार नाही. " ( ८२) लॅन्सबरी यांचे टिळकाना पत्र लंडन ३० मे १९१९ तुम्हाला भेटून कितीतरी दिवस झाले. गेले ६ आठवडे म्हणजे हेरल्ड हे दैनिक पत्र केल्यापासून मी नुसता कामाच्या भोवऱ्यात सापडलो होतो आणि पायावर उभा आहे की डोक्यावर उभा आहे हे कळत नव्हते. पार्लमेंट लवकरच सुटी घेणार. बहुतेक महत्त्वाचे काम संपले. पोलीस यूनियन विलाकरिता काही लोक परत येतील. पण त्या थोड्या वेळात सभा करिता येणार नाही. बेझटवाई व जॉन स्कर हे पुढील आठवड्यात येतील तेव्हा सर्व मिळून आपण काही तरी चांगले धोरण ठरवू. हेरल्डकरिता एखादा लेख पाठवाल काय ? (८३) अहवाल लंडन ५ जून १९१९ पटेल अद्यापि आमचेकडेच आहेत. थोडे दिवसात नॅशनल लिबरल क्लबात जातील. ब्रिटिश काँग्रेस कमिटीचे मत विरुद्ध असेल तर तिने निदान गप्प