पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ लो० टिळकांचे चरित्र भाग १ अवलंबून न राहता आपल्या पक्षाचे स्वतंत्र कार्य करण्याला प्रारंभ करावा असे टिळकानी ठरविले. व हे स्वतंत्र कार्य चालविल्याने संयुक्त राष्ट्रीय सभा होण्याला मदतच होईल असे त्याना वाटले. समेटाचा प्रयत्न ताबडतोब यशस्वी होण्याचे चिन्ह नव्हते तरी त्यामुळे स्वतंत्र राष्ट्रीय सभा भरविण्याची कल्पना टिळकाना पसंत पडली नाही. आणि पुढे मागे ती गोष्ट अनिर्वाय ठरणारच असली तर ती सिद्ध करण्याला आपल्या पक्षाची अधिक संघटना करणे योग्य आहे या दृष्टीने प्रथम आपल्या इलाख्यापुरता प्रयत्न करून पाहण्याकरिता त्यानी राष्ट्रीय पक्षाची प्रांतिक परिषद भरविण्याचे ठरविले. आदल्या वर्षी सातारा येथे टिळक मंडालस असला अशाच उद्देशाने राष्ट्रीय पक्षाची प्रांतिक परिषद भरविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला होता साताऱ्यानंतरची सभा नगर येथे भरविण्याचे चितळे व बाळासाहेब देश- पांडे यानी कबूल केले होते. सातान्यास जशी पाठक व करंदीकर यांची जोडी त्याचप्रमाणे नगरास चितळे व देशपांडे याची जोडी होती. पण मध्यंतरी बाळा- साहेब देशपांडे हे मृत्यू पावल्यामुळे सभा नगरास भरविणे शक्य नव्हते. यामुळे ती बेळगावास भरवावी असा प्रथम विचार होता. पण बेळगावास प्लेग झाला. म्हणून सभा पुण्यासच भरवावी असे ठरविण्यात आले, मे ८-९ व १० या तारखा निश्चित करण्यात आल्या. समेटासंबंधाने टिळकांचे मत काय होते हे पूर्वी आलेच आहे. त्यावरून पाहता ते स्वतंत्र राष्ट्रीय सभा भरविण्याच्या विरुद्ध होते आणि समेटाची शक्यता व इष्टता राष्ट्रीय पक्षातील काही प्रमुख गृहस्थाना अजून पटत नव्हती तरी टिळकाना मात्र ती पूर्णपणे पटली होती. याचे प्रत्यंतर हेच की टिळकांच्या संमतीने परिषदेच्या चिटणिसानी जे जाहीरपत्रक काढले त्यात सातारा सभेच्या तत्त्वावरच पुण्याचीहि परिषद भरविण्यात येणार असे लिहिले होते. ते तत्व असे की काँग्रेसच्या प्रतिज्ञापत्रिकेवर जरी कोणी प्रत्यक्ष सही केली नसली तरी परिषदेस येणाऱ्या प्रतिनिधीना ते प्रतिज्ञापत्रक मान्य आहे असेच समजून चालण्यात येईल. " हे कलम ज्याना मान्य असेल तेच परिषदेचे प्रतिनिधी होऊ शकतील इतर होऊ शकणार नाहीत. " या जाहीरपत्रकात असेहि लिहिले होते की साताऱ्याप्रमाणे येथेहि अधिकारी मंडळी परिषदेशी सहानुभूति दाखवून तिचे काम पार पाडण्यास मदत करतील अशी आशा आहे. यावरून टिळक सरकारावर बहिष्कार घालणार आहेत किवा घालणारे आहेत अशा समजुतीवर मद्रासच्या काँग्रेसमध्ये नेमस्तां- कडून समेटाला विरोध करण्यात आला होता तो वाद व ती समजूत किती व्यर्थ होती है अप्रत्यक्ष रीतीने सिद्ध झाले. ता. २० एप्रिल रोजी 'सार्वजनिक सभे'त जाहीर सभा भरून परिषदेचे स्वागतमंडळ बनविण्यात आले. स्वागतमंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पटवर्धन हे नेमले गेले. शेवटी “लोकमतानुसार डेलिगेट निवडणे ही पूर्वपरंपरा असून पुढेहि ते चालावे इतकाच प्रयत्न आहे व ही मागणी मान्य झाली असतां आम्ही काँग्रे- सची सर्व घटना मान्य करू व काँग्रेसला जाऊ” असे टिळकानी सांगून महाराष्ट्रा-