पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ राष्ट्रीय पक्षाची परिषद २५ होतो हे लक्षांत ठेवूनच प्रत्येकाची किंमत करावी लागते. त्यांचा स्वभाव सौम्य असल्यामुळे हाती घेतलेले काम सौम्य उपायानीच पार पाडण्याकडे त्यांची प्रवृत्ती असे आणि आमच्यासारख्या कित्येक लोकांस हे सौम्य उपचार अनाठायी आहेत असे वाटे. पण पथ्य आणि उपचार यांच्या तीव्रा तीव्रतेसंबंधाने दोन वैद्यामध्ये जरी मतभेद झाला तरी वैद्य या नात्याने गोपाळरावजींची जी योग्यता होती ती आम्हासह मान्य आहे. " गोखले वारले त्यावेळी टिळक गीतारहस्य ग्रंथ तयार करण्याकरिता सिंह- गडास जाऊन राहिले होते. मृत्यूची वार्ता कळताच मंडळींनी त्याना मुद्दाम वाहन पाठवून पुण्यास आणविले. दोनप्रहरी स्मशानयात्रेचा मोठा समारंभ झाला. तेव्हा टिळकानी भाषण करून विद्यार्थ्यास उपदेश केला की "बाबानो गोखल्यांच्या बद्दल नुसती हळहळ वाटून उपयोग नाही. त्यांचे उदाहरण तुमच्या डोळ्यापुढे आहेच व या पिढीच्या विद्यार्थ्यांतून गोखल्यासारखा एक तरी निर्माण होऊन त्याची जागा घेईल तर ही हळहळ वाटल्याचा काही उपयोग.” टिळकांचा गोख- ल्याच्यावरील मृत्युलेख आणि स्मशानातील भाषण ही पाहून काही भोळे लोक म्हणू लागले “ कायहो! गोखल्यांच्या विषयी जर टिळकांचे मत इतके चांगले होते तर जन्मभर त्याना त्यानी नावे का ठेविली व त्याच्याशी का भाडले ? ” दुसरे म्हणाले " जन्मभर नावे ठेवली व भांडले तर मृत्युनंतर तरी असे स्तुतिपाठ गाण्याचे काय कारण ? वाईट मनुष्य काय मेल्याने चागला होतो ? " आणि दुसरे काही म्हणाले " टिळकानी गोखल्यांविषयी मृत्युनंतर जे लिहिले व स्मशानात ते जे बोलले ते मुळी खरे मनचे नव्हतेच. " पण चवथाहि एक वर्ग होता व तो म्ह- णाला " या तिघानाहि काही कळत नाही. मनुष्य तत्त्वाकरिता भाडत असतो. व भांडण हे मतभेदाचे काहीसे विकृत स्वरूप आहे. यत्किंचितही विकार मनात येऊ न देता मतभेद प्रगट करणे ही गोष्ट कोणासहि साधत नाही. टिळक टाकून व स्पष्ट बोलत. गोखले वेगळ्या पद्धतीने बोलणारे होते म्हणून ते फक्त तोंडातल्या तोंडात व तोंड वाईट करून म्हणत 'या टिळकाविषयी जितके कमी बोलावे ति- तके बरे. ' पण व्यक्तिस्वार्थ नसला म्हणजे तत्त्वाकरिता आवेशाने भांडले झगडले म्हणून काय झाले ? प्रतिपक्षी मृत्यु पावला तर वैर हे जसे मरणान्त तसेच त्याच्याशी भांडण हेहि मरणान्तच. अर्थात् मरणानंतर त्याच्या गुणावगुणाचा आढावा घेण्याचेच काम उरते. आणि या आढाव्यात अवगुणांपेक्षा गुणांचीच बाकी फार मोठी रहाते म्हणून त्याची योग्य ती स्तुतीहि करावयाची आणि तेव्हा . मात्र मागे घ्यावयाचे नाही. " (६) राष्ट्रीय पक्षाची परिषद् गोखले यांच्या मरणानंतर संयुक्त राष्ट्रीय सभेचा वाद काही दिवस थांबला. परंतु या कामात झालेला बखेडा लक्षात घेऊन त्यावर भर विशेष न देता व त्यावर