पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ तसे माझ्या मनाला वाटेल. आपण विलायतेत पुष्कळ दिवस रहावे अशी प्रार्थना आहे. 'हाथ जोड करके. (७९) अहवाल लंडन २६ मे १९१९ केळकर वगैरे मंडळी येऊन पोचली. बंदरावर त्याना आणण्याकरिता आमची मंडळी गेली होती. मजूरपक्षाच्या परराष्ट्रीय कमिटीने टिळकाना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसच्या मागणीला एकंदर मजूरपक्षाने संमति द्यावी असा प्रयत्न सुरू आहे. जूनच्या पहिल्या आठवडयात माँटेग्यू बिल पुढे आणणार व मग सिलेक्ट कमिटी नेमणार, अनेक शिष्टमंडळांचे एकीकरण झाले तर फार चांगले होईल. दासबाबू येत नाहीत हे पाहून वाईट वाटते. (८०) अहवाल लंडन २९ मे १९१९ पटेल व केळकर यानी ब्रिटिश काँग्रेस कमिटीशी बोलणे सुरू केले आहे. बिलापूर्वी अगदी वेळेवर शिष्टमंडळ येऊन पोचले. रौलेट बिलाविरुद्ध आणखी एक सभा झाली. हॉलफर्ड नाईट वेजवूड मॅक्डोनाल्ड मॅक्नील यांची भाषणे झाली. त्यानी माँटेग्यू साहेबांचा समाचार घेतला. हे निषेधप्रदर्शन इंग्रजाकडूनच व्हावे असे ठरल्यामुळे हिंदी लोक बोलले नाहीत. मुसलमान लोकांचीहि एक सभा झाली पण ती तुर्कस्थानच्या फाळणीबद्दल. टिळक सभेला हजर होते. नॅश to लिबरल क्लबात एका मिशनऱ्याने भाषण करून हिंदुस्थानात जातिभेद अस ल्यामुळे स्वराज्य देऊ नये असे सांगितले. पण सर जॉन रीस यानीच त्याचा पर. स्पर समाचार घेतला. काँग्रेसच्या शिष्टमंडळाजवळ पैसा नाही. आमच्या होमरूल लीकडे मदत मागतात ! पण "तुम्ही काँग्रेसच्या अधिकाऱ्याकडे लिहा पैसा मागवा नच आला तर आम्ही उसना देऊ" असे होमरूल्लीगने सांगितले. (८१) बातमीपत ता. २९ मे १९१९ राष्ट्रीय सभेने अधिक मागण्या मागितल्या तर त्यापासून माँटेग्यु साहे- बांचे बिलाला धोका येईल आणि पुष्कळांच्या पाठीमागे लागून आयते मिळत होते ते थोडेहि गमावले अशी हिंदुस्थानची हास्यजनक स्थिति होईल हाच काय तो नेमस्तांचा राष्ट्रीय सभेच्या ठरावावर मुख्य आक्षेप आहे हा कितपत खरा आहे यांचा लो. टिळकानी पूर्वीच अंदाज बांधला होता व आम्ही आल्यापासून कसून तलास काढला. त्यात असेच निष्पन्न झाले की केवळ बिलापेक्षा अधिक मागितल्याने बिलाला धोका येईल हे म्हणणे बिलकुल खरे नाही. मि. माँटेग्यु यानी मंत्रिपद