पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र (७६) नामजोशी यांचे धोंडोपंतास पत्र लंडन २२ मे १९१९ ३७ गेल्या आठवड्यात तुम्हा मंडळींची पत्रे आली नाहीत. हे असे कसे झाले ? टिळकाना आता थोडथोडे चालता येऊ लागले आहे. तरी पूर्वीप्रमाणे ते चालू लागण्यास १५ दिवस तरी लागतील. तथापि तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही. केळकर लवकरच इकडे येणार. तेव्हा दादाना हल्लीसारखे अगदी एकल- कोडे वाटणार नाही. (७७) एडगर वॅलेस यांचे टिळकाना पत्र लंडन २३ मे १९१९ फ्रान्समध्ये दोन आठवडे खूप काम करून परत आलो. अधिकाऱ्याशिवाय इतर लोकांच्याहि तेथे गाठी घेतल्या. एका गृहस्थाकडून राजकीय विषयावर आगाखान यांच्याशी संभाषण करविले. मी जवळच होतो. पण मी कोण आहे हे मात्र त्याना कळू दिले नाही. क्लेमेन्तो याना तुम्ही पाठविलेले पत्र त्याना पोहोचले इतके मला पके कळले. पण ते हल्ली फ्रान्सच्या बाहेर कोणत्याहि गोष्टीत लक्ष घालीत नाहीत म्हणून आयर्लंड हिंदुस्थान स्वयंनिर्णय याविषयी ते काही बोलत नाहीत. लॉइड जॉर्ज याना मात्र माँटेग्यू साहेबानी पुढे आणलेल्या सुधारणा अंम- लात आणण्याची आवश्यकता दिसते. म्हणून ते माँटेग्यू साहेबाना आधार देतील. पॅरीसमधील तुमच्या काही स्नेह्यानी लॉइड जार्ज यांची गाठ घेतली. ते म्हणतात संभाषणात आमचे समाधान झाले. पण मला त्याबद्दल शंका वाटते. कारण तुमच्या होमरूल लीगच्या कमिटीचा सगळा कार्यक्रम मंजूर होणार नाही. अफ- गाण प्रकरणामुळे हिंदी लोकाना थोडे खूष ठेवावे असे अधिकाऱ्यांच्या मनात येत आहे ही गोष्ट खरी. आगाखान यांचे बोलणे थोडे प्रतिगामी स्वरूपाचे दिसले. सुधारणा हव्या पण जहाल पक्ष काय करील कोणाला ठाऊक अशी त्याना शंका आली. प्रेसिडेंट विल्सन यांजकडे तुम्ही पत्रव्यवहार केला त्याचा काही सुपरिणाम झाला असे दिसते. पॅरिसमधील राजकीय पक्षातील लोकाना तुमची व तुमच्या कार्याची माहिती आहे असे दिसते. तात्पर्य माँटेग्यु बिल पुढे येण्याच्या सुमाराला मतप्रसार जोराने करावयास पाहिजे असे दिसते. (७८) एलिजाबेथ आर्नोल्ड यांचे टिळकाना पत्र लंडन २४ मे १९१९ मी आपणाला पुढील आठवड्यात भेटावयाला येईन. आपला पाय दुखा- वला असे ऐकिले, ' धर्माबरोबर कर्म ' उभे राहिले असे मी म्हणते. आपले तत्त्वविवेचक संभाषण ऐकिले म्हणजे पहिला पर्जन्य पडल्याने पृथ्वीला बरे वाटते