पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ विशेष गुण. चळवळ करिताना मनुष्याच्या मनात व्यक्तिशः काही काही विकार प्रवल नसावेत आणि तसे तुमचे मन विकारवश नाही असे दिसून आले. कदा- चित तुम्ही ब्राह्मण म्हणून हा गुण तुमच्या अंगी आनुवंशिक व स्वाभाविकच असेल ! तुम्हाला इतके दुःख भोगावे लागले असता त्याच्या प्रतिकारबुद्धीची छटा तुमच्या भाषणात आली नाही. तुम्ही दूरदर्शी आहा हेहि दिसून आले. म्हणून यापुढे माझ्या हातून तुमच्या देशाकरिता जे मला करिता येईल ते मी आनंदाने करीन. आमची संस्थाच मुळी पूर्व व पश्चिम या दोन दिशेकडील देशात स्नेह वृद्धिंगत करण्याकरिता आहे व मीहि एक उच्च ध्येयवादी आहे. (७४) टिळकांचे धोंडोपंतास पत्र लंडन १५ मे १९९९ माझा दुखावलेला गुडघा सुधारत आहे. अगदी चांगले नाही तरी थोडे चालता येते. पण त्यामुळे माझे काम अडले नाही हे तुम्ही पाहताच. बाहेर जाव- याचे असले तर घरातून नामजोशी यांच्या खांद्यावरून जाऊन टॅक्सीत बसतो. आणि व्याख्यानाला जातो. व एकदा खुर्चीवर बसलो की माझे काम सुरू होते. कारण माझ्या पायाला इजा असली तरी माझी जीभ शाबूतच आहे. प्रकृतीची कसलीही काळजी करू नका. (७५) मंडलीक यांचे नामजोशी याना पत्र मुंबई १६ मे १९१९ सत्याग्रहाची चळवळ तूर्त बंद आहे. लोक म्हणतात की 'गांधींच्या प्रेमा- तील काही वजनदार लोक त्यांच्या हल्लीच्या धोरणावर नाखूष आहेत. ' कारण कळत नाही. उमर सोभानी हे नवीन स्वदेशी सभा काढू इच्छितात व महाराष्ट्रीय लोकांची मदत हवी म्हणतात. सय्यद हुसेन यांची व्याख्याने होणार आहेत. पण अशा भाषणानी लोकांची मने अधिक खवळतात म्हणून ती होऊ नयेत असा गांधी यानी अभिप्राय दिला आहे. गांधी यांचे आजचे धोरण तर सर्व चळवळ थांबविण्याचे आहे. पण लोकाना हे मान्य दिसत नाही. 'मुंबई क्रॉनिकल' तूर्त बंद झाला म्हणून 'यंग इंडिया' हे पत्र आठवड्यातून प्रथम दोन वेळ व नंतर दैनिक काढावे असा विचार चालू आहे. लळित बंधु हे लोकसेवक लवकरच काढू म्हण- तात. आणि पुण्यास लोकसंग्रहहि पुढील महिन्यापासून निघणार आहे. दा. सा. यंदे यांच्यापासून राष्ट्रीय पक्षाकरिता 'इंदुप्रकाश' विकत घ्यावा अशी डॉ. साठे यांची सूचना आहे. पण ते कितपत घडेल हे सांगवत नाही. ता. २६ एप्रिल रोजी हार्निमन याना उचलून हद्दपार केले. बेझंटबाईनी नवीन पक्ष बनविला पण त्यात थिअस फिस्ट लोकाशिवाय कोणीच जात नाही असे दिसते.