पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र ३५ आमंत्रणे स्वीकारली आहेत. त्यांची निराशा न व्हावी. तुमचा पाय दुखत असता अशा स्थितीत तुम्ही येऊन व्याख्यान दिले हे लोकाना अधिकच बरे वाटेल. (७१) एडगर वॉलेस यांचे टिळकाना पत्र लंडन ३ मे १९१९ हेरल्ड पत्राकरिता लिहिण्याचे लेख काही तयार केले आहेत. मी फ्रान्सला जाण्याचा परवाना मिळविला आहे. तेथे गेल्यावर बालफोर आणि जनरल स्मट्स यांच्या मुलाखती पॅरिस येथे घेईन आणि इकडे निघण्यापूर्वी कदाचित् तुम्हाला पत्र लिहीन. ( ७२ ) अहवाल लंडन ८ मे १९१९ हाइडपार्कमध्ये ता. १ रोजी मजूरपक्षाची जंगी सभा झाली. तीत रौलेट अॅक्टाविरुद्ध ठराव मंजूर झाला. एक लाख तरी लोक असावेत. आठ ठिकाणी प्लॅटफॉर्म उभे केले होते. सुमारे दहा हजार हस्तपत्रके वाटली. त्यावर स्पूर स्माइली विलियम्स लॅन्सबरी वगैरे लोकांच्या सह्या होत्या. पडून टिळकांचा पाय मुरगळल्यामुळे ते सभेला जाऊ शकले नाहीत. पूर्ववत् चालू लागण्याला त्याना ८ दिवस लागतील. ३ मेच्या सभेलाहि खूप गर्दी झाली होती. हिंदी लोकापेक्षा इंग्र- जच अधिक होते. पाय दुखल्यामुळे टिळकानी भाषण लिहून सभेत वाचण्या- करिता पाठविले होते पण मिसेस रॅनसम यांच्या आग्रहामुळे टिळकाना टॅक्सीत घालून नेले व वर उचलून नेऊन बसविले. तेव्हा टिळकानी तोंडीच भाषण केले. सर विलियम ड्यूक यानी पाच सहा दिवसापूर्वी याच जागी व्याख्यान दिले होते. त्याला उत्तर म्हणून टिळकांचे भाषण झाले. रौलेट अॅक्टावर आणखी एक दोन सभा होणार. समर्थ व के. सी. रॉय हे येथे आले आहेत. त्यानी माँटेग्यू साहेबांची गाठ घेतली. केळकर पटेल वगैरे मंडळी मुंबईहून निघाल्याची तार आली. (७३) अलाइस हॉल सिप्सन यांचे टिळकाना पत्र लंडन १३ मे १९१९ ... कालच्या सभेनंतर तुम्हाला अनेक पत्रे येतील. मी राजकारणात भाग न घेणारी एक स्त्री आहे. फक्त तुमची एक हितचिंतक आहे म्हणून लिहिते. कालचे तुमचे भाषण फारच चांगले झाले असे मला वाटते. नेहमी इतरांच्या ठिकाणी जी सर्यादा रहात नाही ती तुमच्या भाषणात राहिली हाच त्यातील टि. उ... २७