पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ पण लोक चांगले येतात. नॅशनल फेडरेशनची सभा कधी आहे कळत नाही. त्यांच्याकडे आधी ठरावाचे मसुदे पाठवावे लागतील. पोलॉक व कॉटन दे माँटेग्यू चेम्सफर्ड योजनेला आधी गुंतून गेले नसतील तर तुम्हाला उपयोगी पंडावे. काही झाले तरी सुधारणांचा हप्ता एकदम पुष्कळ मोठा मिळावा असे आम्हाला वाटते. (६७) बॅपटिस्टा यांचे टिळकाना पत्र मुंबई २३ एप्रिल १९१९ अहमदनगर येथे प्रांतिक परिषद भरणार आहे तिचा अध्यक्ष म्हणून मी लवकरच तिकडे जात आहे. बेझंट बाईनी उलटी उडी मारिली. तिचा अर्थ आम्हाला कळत नाही. त्यांच्या महात्म्यानाच तो कळत असेल. याहून अधिक चांगली प्रेरणा त्यानी बाईना करावी अशी प्रार्थना आहे. स्करसाहेब इकडे आले आहेत व ते एकदम बेझंटवाईच्या भेटीलाच गेले येथे थांबले नाहीत. काय हेतू आहे कळत नाही. (६८) टी. होल्डरनेस यांचे टिळकाना पत्र इंडिया ऑफिस लंडन २९ एप्रिल १९१९ शांतता परिषदेला पाठविण्याकरिता तुम्ही अर्ज इकडे धाडला पण तो आम्हाला तिकडे पाठविता येत नाही. (६९) टिळकांचे धोंडोपंतास पत्र लंडन १ मे १९१९ पर्स फंडापैकी काहीहि रक्कम येथे पाठवू नका किंवा होमरूल करिताहि माझ्या नावाने असे कोणतेच पैसे येऊ नयेत. रक्कम पाठवावयाची असल्यास केळकर याजबरोबर पाठवा पण ती सुद्धा त्यांचे नांवाने असावी माझे नावाने नको. हिंदुस्थानातील परिस्थिति कठीण होत चालली आहे. पण त्याला इलाज नाही. सगळीकडेच असे होत आहे. ( ७० ) मिसेस रॅनसम यांचे टिळकाना पत्र लंडन २ मे १९१९ तुमचे पत्र वाचून आम्ही काळजीत पडलो आहोत. तुमचे व्याख्यान ऐकण्याची लोकांची इच्छा. ती तुमचा निबंध दुसरा कोणी वाचून कशी भागेल? तुमच्या दाराशी टॅक्सी उभी करून सभेच्या जागी उतरून घेऊन तुम्हाला खुर्ची- वर बसवून वर आणू. तुमच्या दुखावलेल्या पायाला कोणताहि त्रास पडणार नाही अशी व्यवस्था ठेवू. तुम्ही व्याख्यान देणार म्हणूनच पुष्कळ लोकानी