पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ५ निवडक कागदपत्र (६३) जॉन अॅटली यांचे टिळकाना पत लंडन १५ एप्रिल १९१९ तुम्ही पाठविलेली पलके पोहोचली. न्यूझीलंडकडे मी एकदम जात आहे. त्यापूर्वी मी होमरूल लीगच्या कचेरीकडे जाईन व त्यांचेकडे काय वाङ्मय आहे ते पाहून घेईन. मी भावनेने होमरूलर आहे. पण आपण उभे रहातो ती भूमि खंबीर असावी अशा मताचा मी आहे. पुढील काही वर्षांत हिंदुस्थानकडे अनेकं लोकांचे लक्ष लागणार असे उघड दिसते. आणि न्यूझीलंडला मी परत गेलो म्हणजे नुसत्या सहानुभूतीचे उद्गार काढून स्वस्थ न बसता हिंदुस्थानाला काही प्रत्यक्ष मदत करता येईल ती करीन म्हणतो. इकडल्याप्रमाणे बाहेर वसाहतीतह हिंदुस्थानाबद्दल लोकांचा फार गैरसमज आहे. यश ताबडतोब येईल असे नाही पण पुढे आल्याशिवाय रहाणार नाही. (६४) दादासाहेब करंदीकर यांचे टिळकाना पत्र सातारा १७ एप्रिल १९१९ पटिस्टा यांचा स्वागतसमारंभ फार चांगला झाला. इकडील सभातून मीहि तुमची व विलायतेची इकीकत थोडथोडी लोकाना सांगितली. शांतता परि- षदेकडे लोकांचे डोळे लागले आहेत. प्रे. विल्सनच्या प्रत्येक शब्दाकडे लोकांचे लक्ष असते. रौलेट अॅक्टाविरुद्ध चळवळ चालू आहे. सत्याग्रहाच्या चळवळीपेक्षा ही चळवळ अधिक जोरात आहे. इकडे महर्गता अतिशय वाढली आहे व त्याचाहि परिणाम लोकांच्या मनावर होत आहे. (६५) अहवाल लंडन १७ एप्रिल १९१९ हिंदुस्थानात दंगेधोपे झाले त्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यानी मात्र इकडची पत्रे थोडी जागी झाल्यासारखी दिसतात. बातम्या भयंकर आहेत. पण त्या पुष्कळशा एकतर्फी आहेत. शांतता परिषदेतील भांडण मिटलेसे दिसते. हिंदुस्थानचा प्रश्न निघाला होता की नाही याची काही वार्ता कळत नाही. डॉ.: क्लार्क यांच्याप्रमाणे डॉ. रुदरफोर्ड हेहि कमिटीत आता आमच्या बाजूचे बोलू लागले आहेत. (६६) एच. जी चॅन्सेलर यांचे टिळकाना पल हील्सबरो २२ एप्रिल १९१९ तुमची पत्रके पावली. लिबरल पार्टीपुढे कोणत्या रीतीने तुमचे म्हणणे मांडण्याची संधि घडवून आणावी या विवंचनेत मी आहे. लंडनमध्ये ही व्यवस्था लिओनार्ड फ्रॉकलीन याजकडे आहे. लिबरल लोकांच्या सभा मोठ्या नसतात.