पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ लो० टिळकांचे चरित्र ( ५९ ) टिळकांचे धोंडोपंतास पत्र भाग ५ लंडन ३ एप्रिल १९१९ चिरोल केस आपल्यावर उलटली तथापि इतक्यातच येथून हालण्याचा माझा विचार नाही. डेप्युटेशन येण्याची मी वाट पाहात आहे. माझ्या प्रकृति- बद्दल काही काळजी करू नका. यापेक्षा कितीतरी वाईट दिवस आम्ही पाहिले आहेत आणि याचा जर माझ्यावर परिणाम झाला असता तर आज आहे असा मी राहिलोच नसतो ! एक दोन गोष्टी लिहावयास विसरलो. ( १ ) यशवंतराव याना बडोद्यास पाठवून कैफियत दाखल करावी. (२) 'खाल्डियन राष्ट्रे व वेद ' या माझ्या लेखाच्या १२ प्रती इकडे पाठवून द्याव्या. माझ्या खोलीत या प्रती आहेत. (६०) अहवाल लंडन ३ एप्रिल १९१९ रौलेट अॅक्ट पास झाल्याची बातमी आली आहे. आता हिंदुस्थानात काय होते पाहावे. एका हेरल्डखेरीज इतर वर्तमानपत्रे यावर काही लिहीत नाहीत. बसू यांचे सुधारणा बिलाला अनुकूल असे भाषण झाले. मिसेस चार्ल्स रॉबर्टस् या अध्यक्ष होत्या. उपवक्त्यात टिळकानी सुधारणा अपुन्या आहेत असे प्रतिपादन केले. आम्ही कर्नल वेजवूड स्पूर वगैरे लोकांची पार्लमेंटरी कमिटी केली तर प्रतिपक्षानी बेनेट व रीस या लोकाकडून कमिटी बनविली आहे, असा सवाल जवाब सुरू आहे. (६१) अहवाल लंडन १० एप्रिल १९१९ ठरल्याप्रमाणे ता. ७ रोजी टिळकांचे व्याख्यान झाले. लॅन्सबरी रुदरफोर्ड वेजवूड यानी टिळकांच्या म्हणण्याला पुष्टि दिली. डॉ. क्लार्क हळूहळू आमच्या बाजूला येऊ लागले आहेत. शांतता परिषदेत भांडणे झाल्याची वदंता आहे. फिलिपाईन्स बेटांचा प्रश्न निघाला होता. प्रेसिडेंट विल्सन या बेटाना स्वातंत्र्य देऊ म्हणतात. मग हिंदुस्थानानेच काय केले ? (६२) टिळकांचे धोंडोपंतास पत्र लंडन १० एप्रिल १९१९ तुमचे पत्र व सुपारीचे पार्सल पोचले. केसच्या निकालाविरुद्ध आम्ही अपील करीत नाही. फंडाची रक्कम झालेला खर्च फेडण्याकडेच द्यावी लागेल. केसचा निकाल विरुद्ध लागला तरी त्याचा माझ्या प्रकृतीवर यत्किंचित् हि परि- णाम झाला नाही. तुम्ही मुळीच काळजी करू नका. त्यामुळे माझ्या कामामध्ये किंवा प्रकृतिमध्ये यत्किंचितहि बदल झाला नाही असे आपल्या सर्व मंडळीना कळवा. डेप्युटेशन येथे केव्हा येते याची मी वाट पाहात आहे.