पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ लो० टिळकांचे चरित्र भाग १ जनतेच्या मुखात एकत्र नांदू शकतात. त्यांच्यातील वाद दुष्ट स्वप्नाप्रमाणे लोक आनंदानें विसरले. व राजकारणी महाराष्ट्राची स्मृति जोपर्यंत कायम राहील तोपर्यंत हे दोन राष्ट्रपुरुष एकदम सारखेच डोळ्यापुढे आल्याशिवाय राहणार नाहीत. 33 टिळकाप्रमाणे गोखल्यांच्याहि स्वभावात व्यंगे नव्हती असे नाही. ते तापट नसले तरी त्रासिक होते. त्यांचा स्वभाव थोडा हावळा व चिरचिरा होता. वेळ आली असता कोणाला टाकून बोलणार नाहीत किंवा त्याचा पाणउताराहि करणार नाहीत असे नव्हते. टिळकांनी जरी त्यांची निंदा केली तशी त्यानीही टिळकांची करावयाला सोडले नाही. टिळकांची एक प्रकारची तर त्यांची दुसऱ्या प्रकारची. पुण्याच्या दुखवट्याच्या सभेत एका वक्त्याने केलेले त्यांचे वर्णन येथे दिले असतां अप्रस्तुत होणार नाहीं. "ॲरिस्टॉटल याच्या व्याख्येप्रमाणे गोख- त्यांनी अवगुण व गुणातिरेक या दोहोमधल्या सुवर्णबिंदुचा बरोबर वेध केला होता. त्यांच्या अंगी धारिष्ट नव्हते पण धैर्य होते. तीव्र मतभेद पात्रता होती पण भांडखोरपणा नव्हता. शब्दांत गोडी किंवा मवाळी होती पण तोंडदेखलेपणा किंवा तोंडपुजेपणा नव्हता. त्यांचा शब्दस्पर्श मृदु पण तत्त्वाला ते कठोर होते. त्यानी हातात मखमलीचे हातमोजे घातलेसे वाटले तरी आंत वळलेली मूठ लोखंडी किंवा पोलादी असे. ते सुविनीत असत पण भिऊन वागत नसत. ता. २३ फेब्रुवारीच्या केसरीत टिळकानी अग्रलेख लिहून गोखले यांचे जे गुणवर्णन केलें त्यातील एकदोन उतारे येथे देऊन हैं गुणवर्णन संपवू. " एका गरीब ब्राह्मणाच्या मुलानें अभ्यास करून परीक्षा पास झाल्यावर थोड्याच वर्षात हत्ती घोडे संपत्ति सत्ता किंवा अशी दुसरी बाह्य साधतें जवळ नसता सर्व देशात आपले नांव आबालवृद्धांचे तोंडी ठेवून जावे हे कांही लहानसान काम नव्हे. गोखल्यांच्या अंगी अनेक गुण होते. पण मुख्य गुण म्हटला म्हणजे निर्लोभ अंतःकरणानें . वेळीच देशकार्याला वाहून घेणे हा होय. तरुणपणीं संसार यथास्थित करून मंदा- वलेल्या कायिम व मानसिक शक्ती इतर कर्तव्याच्या अभावी लोकोपयोगाला वाहणारे पुरुष आढळल्यास त्यांच्याबद्दल विशेषशी आदबुद्धी मनांत उत्पन्न होत नाहीं. पण इंद्रियशक्ती शाबूद आहेत स्वार्थासाठीं उद्योग करण्यास शरीर समर्थ आहे वार्धक्य अजून दूर आहे आणि संसारांतील सुखाचे स्वरूप अद्याप मनोहर असून तिकडे चित्ताची प्रवृत्ति होणें साहजिक आहे अशावेळी, आणि विशेष- करून या दिशेने गेले असतां आपणांस यश मिळण्याचा संभव इतरापेक्षां काकण- भर अधिक आहे अशी मनास खात्री वाटत असताहि या सर्व मनोहर देखाव्या- वरून दृष्टी मागे ओढून यथाशक्ति आपल्यास देशकार्याला वाहून घेणे त्यांत आलेली संकटे सोसण्यास कबूल असणे किंबहुना त्यांतच आनंद मानून त्यासाठीं सतत परिश्रम करण्यास तयार होणे याला एक प्रकारचा बळकट मनोनिग्रह लागतो. आणि तो मनोनिग्रह ज्याने दाखविला व नुसता दाखविला नव्हे तर आमरणांत कायम ठेवला तोच पुरुष धन्य होय. मनुष्य कोणत्या बुद्धीनें प्रवृत्त