पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र २९ असे मी त्याना सांगितले आहे. लॅन्सबरी हैहि बाईंना लिहिणार आहेत. दिल्ली- काँग्रेसच्या ठरावाना धरून सर्व एकमुखाने बोललो तर चांगले होईल. अधिक मागितल्याने मुळात आहे तेहि मिळणार नाही ही भीति खरी नाही. लॉर्ड सिडे- नहॅम यांचा उगीच बाऊ दाखवितात. पण परवा लॉर्ड सिंह बिकानेरचे महाराज व माँटेग्यू यानी त्याना झणझणीत उत्तर दिले आहे. लहान सहान सभातून टिळक व्याख्याने देऊ लागले आहेत. शिष्टमंडळे येतील त्यांची व्यवस्था डॉ. क्लार्क व लॅन्सवरी मिळून करणार आहेत. अमेरिकेत लाला लजपतराय यानी आमची हस्तपत्रके पुनः छापून अमेरिकन पार्लमेंटच्या सभासदात वाटली. (५१) मंडलिक यांचे नामजोशी याना पत्र मुंबई १४ मार्च १९१९ रायगडावर उत्सव करण्याची परवानगी मिळाली आहे. ता. १ मे रोजी उत्सव करू. मुंजे चिंतामणराव वैद्य व मी गांधीजीना भेटण्यासाठी सकाळी गेलो. वैद्य म्हणाले पुढारी मंडळीची सभा बोलवावी. गांधीजी म्हणाले केवळ सत्या- ग्रहाच्या शपथपत्रिकेवर ज्यानी सह्या केल्या त्यांशिवाय इतर लोकांच्या सभा आपण बोलावणार नाही. त्यांचे म्हणणे हे की जो रागावल्याचे यत्किंचितहि चिन्ह दाख- वितो तो खरा सत्याग्रहधर्मी नव्हे, वैद्य म्हणाले की तर मग आम्हाला प्रतिज्ञा- पत्रिकेवर सही करता येणे कठिण आहे. मला असे दिसते की ज्यानी प्रतिज्ञा- पत्रकावर सह्या केल्या आहेत त्या सर्वाची परीक्षा गांधीजी पहाणार. याचा अर्थ पुष्कळाना तुरुंगात जावे लागणार. सुमारे एक आठवड्यात सत्याग्रहाची मोहीम सुरू होणारसे वाटते. (५२) हाइंडमन यांचे टिळकाना पत्र लंडन १५ मार्च १९९९ आमच्या नॅशनल सोशियालिस्ट पार्टीमध्ये हिंदुस्थानातील सुधारणा व त्यासंबंधाची वाटाघाट केली. आम्हाला हिंदुस्थानात सुधारणा होणे इष्ट वाटते. गेली ३८ वर्षे आमचा पक्ष या दिशेने खटपट करीत आहे. हल्लीची राज्यव्यवस्था हिंदुस्थान व इंग्लंड या दोघानाहि वाईट आहे. आणि आमचा पक्ष ती व्यवस्था बदलण्याला व सुधारण्याला मदत करील. पण हल्ली ज्या मजूरपक्षाशी तुम्ही संबंध ठेवता त्यांच्याशी आम्हाला सहकारिता करिता येत नाही असे आम्ही सर्वानुमते ठरविले आहे. तसे करण्यापासून आमचे येथील वजन कमी होणार आहे. आणि त्यापासून हिंदुस्थानालाहि फायदा नाही. लॅन्सबरी स्कर वेजउड यांच्याशी नॅशनल सोशिओलिस्ट पार्टी ही संबंध ठेवू इच्छित नाही ! यामुळे तुमच्या इच्छेप्रमाणे आमच्या पक्षापुढे तुमचे व्याख्यान करणे घडून येईल असे वाटत नाही.