पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ घेऊनच चालले होते त्यामुळे त्याना काही विशेष आश्चर्य वाटले नाही. आपल्या खजीचा अंदाज ताबडतोब कळविण्याविषयी मी आपणाला तार पाठविली आहे. झाल्या गोष्टीचा विचार न करिता आपल्या पुढील कर्तव्याला लागावे असे लोकानी ठरविले आहे. तरी तपशीलवार तार पाठवा म्हणजे किती रकम किती हप्त्यानी पाठवावयाची त्याच्या अंदाजाने वर्गणी जमविण्याचे काम करिता येईल. आपली तार येण्यापूर्वी खर्चाचा अंदाज तीन लक्ष रुपये असा ठरवून त्या उद्यो- गाला मंडळी लागली आहेत. बॅपरिस्टा इकडे आल्यावर तिकडची सर्व हकीगत कळेल. रौलेट बिलाचा निकाल उद्या लागणार आहे. (४८) टिळकांचे केळकराना पत्र लंडन १३ मार्च १९१९ या सोबत आठवड्याचा अहवाल पाठविला आहे. त्यातील काय छापावे काय छापू नये हे वाचून नीट ठरवा. चिरोलकेसमध्ये अपिल करावे की नाही यासंबंधी विचार बाबाच्या पत्रात लिहिले आहेत. दादासाहेब करंदीकर आज मनोरा बोटीने तिकडे परत निघाले. ते व बॅपटिस्टा यांच्याकडून तुम्हाला इकडची प्रत्यक्ष माहिती मिळेल. शिष्टमंडळाबरोबर तुम्ही आता होईल तितके करून लव- कर या. मला मदत करण्याला येथे आता कोणी नाही. ( ४९ ) टिळकांचे धोंडोपंतास पत्र लंडन १३ मार्च १९१९ चिरोलकेसमध्ये आम्ही हरलो. एकंदर वकिलांच्या सल्ल्याने अपील करू नये असे ठरले. ब्रिटिश न्यायाची परीक्षा पाहण्यात आम्हाला फार मोठा भुर्दंड पडला ! आता निष्कारण चांगला पैसा पाण्यात ओतण्यात अर्थ नाही. अपीला- मध्ये तरी यशाची खात्री कोठे आहे ? आपला काळ बदलला आहे. आणि राज- कीय मतापासून अलिप्त व स्वतंत्र असलेली ज्यूरी किंवा न्यायाधीश आपणाला येथे मिळेल असे वाटत नाही. माझी प्रकृति खरोखरच चांगली आहे. मुंबई सोड- ल्यापासून मी येथे एकहि दिवस आजारी पडलो नाही. (५०) अहवाल लंडन १३ मार्च १९१९ पटिस्टा येथून २७ फेब्रुवारीला निघाले. करंदीकर आज निघतात. दोघेही इकडली सर्व हकीकत सांगतील. पोलॉक व त्यांचे धोरण यांच्यावर टिळक करंदी- कर बॅपटिस्टा अयंगार आणि घोष या सर्वांच्या सहीवर मिळून टीका प्रसिद्ध झाली त्याला पोलॉक यानी हिंदुस्थानात उत्तर पाठविले आहे. त्यांचे म्हणणे कमिटीचा व इंडिया पत्राचा काँग्रेसशी काय संबंध ? मि. स्कर हे तिकडे गेले आहेत. ते काय योजून गेले हे कळत नाही. पण दोन्ही होमरूललींगांचा समेट घडवून आणा