पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० लो० टिळकांचे चरित्र (५३) एलिझाबेथ आर्नोल्ड यांचे टिळकाना पत्र लंडन १६ मार्च १९१९ भाग ५ आपले पत्र पावले आपणाला येथे एखाद्या गोष्टीची गरज असेल व माहिती पाहिजे असेल तर मला लिहा. माझ्या वैदिक गुरूना माहिती पुरविणे हे माझे कर्तव्य आहे. माझे पुस्तक युरोपातील लोकाना आवडणार नाही. माझ्या पुस्तकातून हिंदी अंतःकरणाचा ध्वनि उमटलेला आहे. म्हणून हिंदुस्थानात त्याला वाचक मिळतील. माझ्या नित्य उपासना काही अंतरल्या. ' मत्कर्मकृत् मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः ' हे वचन लक्षात आहे. ( ५४ ) अहवाल लंडन २० मार्च १९१९ अपील करू नये असे निश्चित ठरले. पुढील महिन्यात टिळक चार पाच व्या- ख्याने देणार आहेत. आणि काँग्रेसच्या मागणीला दुजोरा देण्याकरिता पाले- मेंटच्या काही सभासदांची एखादी कमिटी बनविता येते का हे पाहात आहो. येथील वर्तमानपत्रे आम्हाला अजून दाद देत नाहीत. युद्ध व तह यांचे विषय संपल्यावर आमच्याकडे लक्ष देतात का पाहू. ब्रिटिश काँग्रेस कमिटी किंचित् आपल्या बाजूला वळू लागली आहे. पण पोलॉक साहेब मात्र दाद देत नाहीत. पाहून घेऊ. ( ५५ ) अहवाल लंडन २६ मार्च १९१९ उद्या नॅशनल लिबरल क्लबात, २८ तारखेला पॉसिटिव्हिस्ट सोसा- यटीपुढे, ७ एप्रिलला एसेक्स हॉलमध्ये, ३ मेला ब्रिटन अॅन्ड इंडिया सोसायटीत आणि ९ मेला फेबियन सोसायटीत टिळक भाषणे करणार आहेत. सुधारणा संबंधाने एक तुलनात्मक हस्तपत्रक आम्ही तयार केले आहे. लॉर्ड चेम्सफर्ड राजीनामा देणार व ड्यूक ऑफ नॉर्दबर्लंड तिकडे जाणार असे म्हण- तात पण पक्के नव्हे. (५६) टिळकांचे केळकराना पत्र लंडन २७ मार्च १९१९ बॅपटिस्टा यानी भेटून आपली मंडळी व बेझंटबाई यांच्यातील मतभेद दूर केला असेलच. आपले होमरूल लीगचे शिष्टमंडळ लहानच पण वजनदार आणि एका जीवाभावाचे असले पाहिजे. जमले तर तुम्ही व बॅपटिस्टा दोघेही मिळूनच या. येथे तुम्हा दोघांची मला फार गरज आहे. माझे येथे तुपाच्या डब्या- वाचून फार अडत आहे. तरी तो घेऊन या. बाबा याना मी लिहिले आहे की भावे यांजकडे गहाण ठेवलेल्या एक लक्षाच्या सरकारी प्रॉमिसरी नोटा शेकडा