पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र २७ ण्याची लॉईड जॉर्ज याना विनंती करावी. राष्ट्रीय सभेचा प्रत्यक्ष संबंध शांतता परिषदेशी अधिकारी येऊ देणार नाहीत. या ठरावाच्या प्रती शांतता परिषदेच्या सर्व सभासदाना पाठवाव्यात. बेझंटवाईना या गोष्टीचा नीट विचार करावयास लिहा. मुंबईच्या ठरावाना अनुसरून यावेळी पार्लमेंटकडे अजीची भेंडोळी आली पाहिजेत. शिष्टमंडळाना मार्च किंवा मे पर्वत इकडे येऊ देणार नाहीत. कारण शांतता परिषद त्यापूर्वी संपून जायला हवी ना ? आधी सर्व स्थिरस्थावर करतील आणि मग म्हणतील ठीक आहे आता या आणि आपले म्हणणे खुशाल सांगा ! (४५) एलिझाबेथ आर्नोल्ड यांचे टिळकाना पस लंडन ३ मार्च १९१९ तुमचे नाव बाळ गंगाधर आहे. म्हणून पूर्वी आजारीपणात मी गंगा- वर्णनाच्या ज्या कविता लिहिल्या त्या आपणाकडे पाठवीत आहे. (४६) टिळकांचे केळकरांना पत्र लंडन ६ मार्च १९१९ शिष्टमंडळ इकडे आल्याने माँटेग्यूच्या योजनेत सुधारणा होण्याचा संभव आहे. सोबत टाईम्सचा अंक पाठविला आहे तो पाहा म्हणजे कळेल. याविषयी नेमस्त लोकाना भीति वाटते ती खरी नाही. शिष्टमंडळ येणार ते वजनदार असावे. टाईम्समधील लेख वाचून बेझंटबाई तुमच्या बाजूला येऊन मिळतील असे वाटते. शिष्टमंडळे चार पाच असावी. उदाहरणार्थ ( १ ) सर रवीन्द्रनाथ टागोर व महमुदाबादचे राजेसाहेब - अगदी वरिष्ट वर्गात यांचा उपयोग होईल. (२) दास व बॅपटिस्टा याना पार्लमेंटरी कमिटीपुढे साक्षी देण्याला घालू व व सुधारणांच्या बिलात उपसूचना मांडण्याला हे उपयोगी पडतील. ( ३ ) स्वतः तुम्ही व इतर काही लोक हे आला म्हणजे आमचे सेक्रेटेरियट बनेल ( ४ ) बेझंटबाई- त्यांचा मजूरपक्षाकडे व स्त्रीवर्गात उपयोग होईल (५) खापर्डे मदन- मोहन म्हणजे कायदेकौन्सिलचे सभासद हे सरकारी अधिकान्याशी बोलण्या- चालण्याला उपयोगी पडतील. याप्रमाणे माझी योजना आहे. तुम्ही आलेच पाहिजे. करंदीकर परत येईन असे सांगून गेले आहेत. शिष्टमंडळात तेहि असावे. बर्न कमिटीचे ठराव सोबत पाठविले आहेत. हेरल्डमध्ये माझ्या भाषणाचा सारांश आला आहे तो पाहा. (४७) केळकर यांचे टिळकाना पल पुणे ७ मार्च १९१९ खटल्याचा निकाल प्रतिकूल झाल्याची तार पूर्वीच मिळाली. तो ऐकून पुष्कळ लोकांच्या मनाला धक्का बसला. परंतु कित्येक लोक असे होणार असे