पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ आम्ही त्याना काही दिले नाही. होता होईतो ही रकम तशीच ठेवून आणखी रकम इतर रीतीने जुळवून खर्च भागवावा असा विचार आहे. (४३) टिळकांचे केळकराना पत्र .. खटल्याचे लिहिले. आता राजकीय वावीविषयी थोडे लिहितो. येथे काय चालले आहे याची कल्पना तुम्हाला सहसा येणार नाही. पार्लमेंट लॉईड जॉर्ज यांच्या मुठीत आहे. मजूरपक्ष भिंतीवर धडक्या मारीत आहे. पण. त्याचा फारसा उपयोग होत नाही. माँटेग्यू चेम्सफर्ड रिपोर्टाइतक्याहि सुधारणा पदरात पडण्याचा रंग नाही. सिलेक्ट कमिटीचे काम संपताच एकदम बिल प्रविष्ट होईल व झटपट पास होऊन जाईल. यावरून शिष्टमंडळ कसे असावे याची कल्पना येईल. पुष्कळ लोक येण्याने विशेष साधणार नाही. फुकट खर्च होईल. अगदी थोडे शेलके लोक आले तर बरे. इकडे व्याख्याने हवी पण ती हळूहळू सारखी पेरीत राहिले पाहिजे. थोड्या वेळात पुष्कळ देऊन फारसा उपयोग नाही. मला शांतता परिषदेकडे प्रतिनिधि म्हणून पाठविण्याचा ठराव पोचला. हा प्रश्न लीग ऑफ नेशन्सपुढे आणण्याचा प्रयत्न आहे. काय होईल पहावे. बेझंटवाई व काँग्रेस यांचा सलोखा होत नाहीसे दिसते. त्यांचे शिष्टमंडळ स्वतंत्र येणार तर येवो. पण त्यांचा व आपला येथे विरोध दिसू नये. मी त्याना एक सामोपचाराची तार पाठवीत आहे. शांतता परिषद वगैरेसंबंधाने आम्ही तुम्हाला कळवू ते कोण- त्याहि रीतीने प्रसिद्ध करण्याचे नाही. ११ तारखेला पार्लमेंट उघडेल तेव्हा कोणाकडून तरी प्रथमच हिंदुस्थानच्या स्वयंनिर्णायक हक्काचा प्रश्न काढता आला तर पाहतो. पण शांतता परिषद संपण्यापूर्वीच पार्लमेंटला न डिवचलेले बरे. बमनजी हे लवकरच इकडे येतील. त्यांचा आम्हाला बराच उपयोग होईल असे वाटते. गेले तीन दिवस बर्फ एकसारखे पडत आहे. तथापि प्रकृति ठीक आहे. (४४) टिळकांचे केळकराना पत्र येथील ब्रिटिश काँग्रेस कमिटी संबंधाने आमचे विचार दिल्ली येथील स्वागत मंडळाकडे व इतराकडे पाठविले आहेत. या कमिटीची उपयुक्तता काही राहिलेली नाही. उलट तिच्यापासून अपाय होऊ लागला आहे. ती सुधारेपर्यंत तिला पैसे पाठविण्यात अर्थ नाही. राष्ट्रीय सभेला अध्यक्ष कोण निवडावा या विषयी मी काहीच मत ठरविले नाही. सर रवींद्रनाथ टागोर ते स्थान सहसा स्वीकारणार नाहीत. विजयराघव किंवा नेहरु यापैकी कोणीही आपल्या कार्याला उपयोगी पडतील, मुंबईस झालेल्या ठरावाच्या मागे पाऊल जाता कामा नये. त्यामागे तुम्ही जाल तर सुधारणांची योजना आहे त्याहून चांगली करण्याचे आमचे येथील प्रयत्न फुकट जातील. मजूरपक्ष पूर्णपणे आमच्या बाजूला आहे. जमल्यास राष्ट्रीय सभेने एक ठराव करून शांतता परिषदेपुढे राष्ट्रीय सभेचे विचार मांड--