पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र २५ सांगा की विलायतेत चित्रमयजगत् काढण्याचा तुमचा निश्चय ठरला असेल तर एडिटर येऊ घातला आहे ! जागा रिकामी ठेवा ! " (३९) टिळकांचे पुण्यास पत्र लंडन १३ फेब्रुवारी १९१९ केस चालू आहे. सध्या माझी उलट तपासणी सुरू असल्याने या आठव- ड्यात तुम्हास लिहिण्यास होत नाही. (४०) एलिझाबेथ आर्नोल्ड यांचे टिळकाना पल लंडन १४ फेब्रुवारी १९९९ बनारस येथील माझे बंधु सच्चिदानंद ब्रह्मचारी शर्मा यानी ब्रह्मसूत्राच्या प्रति पाठविल्या. तरी आपली गाठ घेण्याला एखादा दिवस ठरवून कळवावे. आपण एवढे वैदिक पंडित आहा म्हणून आपणाला त्रास देणे आहे. माझा भाऊ तत्त्व- ज्ञानात गढून गेला आहे आणि मी कविताकौमुदी आहे. आणि मी जेथे जाते तेथे गंगामाता माझ्या डोळ्यापुढे उभी असते. हिंदुस्थानासंबंधाने मी लिहिले ते पुस्तक लवकरच प्रसिद्ध होईल. हल्ली येथे युद्धासंबंधीचे काही काम मी पत्करिले आहे. त्याचे बरेच श्रम पडतात. 'रायटर्स क्लब' या पत्त्यावर मला पत्र पाठविले असता लवकर पोहोचेल. ( ४१ ) टिळकांचे पुण्यास पत्र लंडन २० फेब्रुवारी १९१९ चिरोल केस चालू असल्यामुळे तुम्हा कोणासहि पत्र लिहिण्यास फावत नाही. आजचा दहावा दिवस व उद्या अकराव्या दिवशी केस संपणार. कोर्टाच्या प्रत्येक दिवसाचा खर्च सुमारे चारशे पौंड द्यावा लागत आहे. याशिवाय श्रीफ वाचण्यास तीन हजार पौंड द्यावे लागले ते निराळेच. म्हणजे एकूण खर्च सुमारे सात हजार पा व काही जास्त इतका होणार. बॅपटिस्टा पुढल्याच आठवड्यात हिंदुस्थानात परत येत आहेत. त्यांचे बंदरावर चांगले स्वागत करा. होमरूल लीगच्या खर्चाने हिंदुस्थानभर दौरा करण्यास त्याना सांगितले आहे. (४२) डॉ. हर्डीकर यांचे टिळकाना पत्र न्यूयॉर्क २० फेब्रुवारी १९१९ आपले पत्र व रिपोर्ट मिळाले. आपण पाच हजार डॉलर पाठविले त्यानंतर हॉचनेर हे त्यातील अडीच हजार डॉलर मागण्याकरिता आले होते पण