पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ जिस सरकारने दिले त्यातला एक माझे नावाचा आहे. तेव्हा आता मला निश्चितपणे लिहा आणि सांगा की मी तिकडे आलोच पाहिजे की काय ? किंवा पुनः पूर्वी- प्रमाणे वर्तमानपत्रे घेऊन येथील उद्योग सुरू करू ? चिरोल केसचा निकाल लागल्याबरोबर ही गोष्ट आपणास निकालात काढावी लागेल. माझा आपणाला तेथे खरोखरच उपयोग असेल तर आपले लिहून आल्याबरोबर निघतो. पण नव्या परिस्थितीत मी येऊ नये असे वाटेल तर तसे बेलाशक लिहा. म्युनिसिपल प्रेसिडेंट या नात्याने माझे काम सुरू आहे. व कौंसिलच्या निवडणुकीतहि मी खास निवडून येईन. किंबहुना कोणी प्रतिस्पर्धीहि मला उभा राहणार नाही. पण मी आल्याने आपला तेथे अधिक उपयोग होईल असे असेल तर मी म्युनिसिपल प्रेसिडेंटशिपचाहि राजीनामा देऊन येतो. असे दुहेरी लिहिण्याचे कारण इतकेच की मला विलायतेस येण्याची हौस किंवा महत्त्वाकांक्षाहि नाही. ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसची मँडेट ढिली करण्याचा प्रयत्न होत आहे. इतके करून तरी जिना विलायतेस जाणार की नाही कोणी सांगावे ? बेझंटवाईबद्दल बंगाल व मध्यप्रांत यामध्ये प्रतिकूल भावना दिसते. त्या स्वतः व रामस्वामी अय्यर याना त्यानी कॉंग्रेसचे सेक्रेटरी नेमून घेतल्यामुळे लोकाना बरे वाटले नाही. उलट आपण जसे बेशंटवाईशी जमवून घेता तसे इतर लोक घेत नाहीत. बेझंटवाईची प्रांतिक स्वातंत्र्याविषयीची उपसूचना दास व खापर्डे यानीही मान्य केली. पण सत्यमूर्ती आडवे आले. बरे दास किंवा विजयराघव हे बाईना विरोध करतात पण स्वतः विलायतेला जाण्याला तयार होत नाहीत. विजयराघव याना बाईचे वर्चस्व नको पण आमच्या होमरूललीगची शाखा काढा म्हटले तर तेहि करीत नाहीत. बरे बाईहि काही कमी नाहीत. शांतता परिषदेकडे प्रतिनिधि म्हणून बाकींच्या बरोबर तुमचे नाव लोकानी सुचविले त्याला त्यानी विनाकारण हरकत घेतली. अशा रीतीने तीन शिष्टमंडळे जाणार, पण आता गांधीनी असे म्हणण्यास आरंभ केला आहे की विलायतेला शिष्टमंडळ पाठवूच नये. मी त्याना लिहिले आहे की नेमस्त लोकांचे शिष्टमंडळ जाणार तर काँग्रेसला आपली मते मांडण्याकरिता आपलेहि शिष्टमंडळ पाठविले पाहिजे. शिष्टमंडळाच्या निरनिराळ्या लोकाना पत्रे वगैरे रोज लिहावी लागत आहेत. कलकत्त्यास जाऊन दासबाबू शिष्टमंडळावर कोणाला पाठवितात व खर्चाला किती रक्कम देतात हे मी पाहणार आहे. कदाचित् त्याचकरिता मद्रासेसहि जावे लागेल. आमच्या व्याख्यानाचे दौरेहि सुरू आहेत. खाडिलकर व शिवरामपंत यानी वऱ्हाड नाग- पुराकडे जाण्याचे कबूल केले आहे. पण हे सर्व बेत चिरोल केसच्या निकालावर बरेचसे अवलंबून आहेत. आपण केस जिंकली तर चळवळीवर खर्चण्याला बरीच रक्कम मोकळी होईल. पण आपण केस हरलो तर मग खर्चाच्या दृष्टीने हि कोणी जावे कोणी जाऊ नये हे पाहावे लागेल. गंगाधरराव देशपांडे हे दक्षिण भागाच्या कौन्सिल निवडणुकीकरिता उभे राहणार आहेत. वासूकाका जोशाना