पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र (३५) केळकर यांचे टिळकाना पत्र पुणे ३१ जानेवारी १९१९ २३ आपली तार पोहोचली. होमरूलच्या अध्यक्षाच्या जागेचा राजीनामा दिलेली बॅपटिस्टा यांची तार पोहोचली. दोघाना उत्तरादाखल दोन निरनि- राळ्या तारा मी केल्या आहेत. त्याचे कारण आपल्या लक्षात येईलच. बॅपटिस्टा हे राजीनामा देणारच तर आपण लेबर परिषदेला जाणार ते होमरूल लीगचे अध्यक्ष या नात्यानेच का न जावे ? शिष्टमंडळाची निवडणूक सुरू आहे. दिल्ली येथे ता. ९ फेब्रुवारी रोजी अखेर निकाल लागेल. जिना मालवीय गांधी व मिसेस बेझंट याखेरीज बाकी बहुतेक प्रमुख काँग्रेसमेन शिष्टमंडळावर जाण्याला तयार आहेत. वरील लोक मात्र तयार नाहीत. याचे कारण ते म्हणतात 'एक- दम प्रांतिक स्वायत्तता (प्रॉ० ऑटॉनमी) मागण्याला आम्ही तयार नाही.' बेझंट- बाई या गोष्टीना पूर्वी तयार होत्या. आता मात्र नाहीत. १५ प्रतिनिधींना सर- कारने पासपोर्ट देण्याचे ठरविले आहे. मी असे ऐकतो की मुंबई सरकारने प्रांतिक स्वातंत्र्य द्यावे अशी सूचना केली आहे. लॉर्ड विलिंग्डन यांच्या शिवाय इतर कोणी हे श्रेय घेतले नाही. फ्रेंचाइज कमिटीपुढे साक्षीला मी जाणार आहे. (३६) टिळकांचे गोखले याना पत्र लंडन ६ फेब्रुवारी १९१९ आमचा खटला फिरून फेब्रुवारीला सुरू होईल असे वाटते. झाल्या कामाचे लघुलेखकांचे छापील रिपोर्ट यासोबत पाठविले आहेत. हे पत्र पुण्यास पोचण्यापूर्वीच खटल्याचा निकाल होईल. (३७) एस. सी. टिले यांचे टिळकाना पत्र फॉरिन ऑफिस लंडन ६ फेब्रुवारी १९१९. तुमचा अर्ज इंडिया ऑफिसकडे पाठविला आहे. पण तुम्ही मागितलेला पासपोर्ट देता येत नाही. (३८) केळकर यांचे टिळकाना पत्र ७ फेब्रुवारी १९१९ दिल्लीहून परत आलो. काँग्रेसचे शिष्टमंडळ पाठविण्यासंबंधाने व्यवस्था करावयाची होती म्हणून गेलो होतो. पंधरा लोकांची निवड केली आहे, पण प्रत्यक्ष कोण येथून पाय उचलतो हेच पाहावयाचे आहे. खापर्डे मी पटेल पाल जोसेफ नरसिंह अय्यर हे केव्हाहि निघण्याला तयार आहोत. पंधरा पॅसे-