पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ लौ० टिळकांचे चरित्र. भाग ५ म्हणता येत नाही. तिकडून पैसे मागविले ते मजूरपक्षाला देण्याकरिता. बॅप- टिस्टांच्या निवडणुकीला नाहीत. " (३२) अहवाल लंडन आम्ही येथे आक्टोबरात आलो व नोव्हेंबरात आमच्या कामाला सुरवात केली. तात्पुरता तह होऊन युद्ध थांबल्यामुळे इकडे आनंदाची लाट उसळली आहे. पण नव्या पार्लमेंटरी निवडणुकीहि उपस्थित झाल्या आहेत म्हणून या पुरात जाळे टाकून हाताला काही लागते का पाहिले. मजूरपक्षाचे शंभर तरी सभासद निवडून यावे असे वाटले पण अवघे त्रेसष्टच आले. युद्धाविरुद्ध ज्यानी लिहिले जे बोलले त्या सगळ्यांचा एकजात पराभव झाला ! रॅम्से मॅकडोनाल्ड स्नोडन हेंडरसन लॅन्सवरी सगळे पडले ! तथापि आम्हाला आज मदत मिळेल तर मजूर पक्षाचीच. निवडणुकींची संधि साधून आम्ही विलायतेत सुमारे दहा लक्ष हस्तपत्रके हिंदुस्थानासंबंधाची वाटली. बेझंटबाईंच्या होमरूल लीगनेहि काम चांगले केले. काम नाही केले असे ब्रिटिश काँग्रेस कमिटीने ! तेव्हा तिच्याविरुद्ध न ल्याहावे तर काय करावे ? तिने आमचे काम करण्याऐवजी पोलॉक साहेबांचे मन वळविण्यात व त्यांच्याशी भांडण्यात आमचा वेळ खर्च घातला. पण आम्ही त्यांच्यावर थोडेच अवलंबून होतो. आम्ही छापलेले पुस्तक व चित्र पाठविलेच आहे. हिंदुस्थानातील ३६ जाहीर सभातून शांतता परिषदेविषयी ठराव झाले ते इकडे आले. पॅरिसला जाण्याकरिता पासपोर्ट मागितले आहेत. मिळाले तर जाऊन खटपट करू. येथे सोन्याच्या किल्लीशिवाय वर्तमानपत्रांचे तोंड उघडत नाही. तथापि टिळक गांधी आणि हसन इमाम यांची निवड केल्याचे स्वतः टाईम्सनेच प्रसिद्ध केले आहे. (३३) ठी. होल्डरनेस यांचे टिळकाना पल लंडन इंडिया ऑफिस २८ जानेवारी १९१९ शांततापरिषदेला कोण प्रतिनिधि पाठवावयाचे हे आता ठरले आहे. तुम्हाला शांततापरिषदेला पाठवावे अशी तुमची यादी आली. परंतु तसे करता येत नाही. पासपोर्ट मागताना निदान प्रेक्षक म्हणून हजर रहावे अशी इच्छा तुम्ही व्यक्त केली पण तीहि सफल होणे शक्य नाही. म्हणून पासपोर्ट देता येत नाहीत. (३४) टिळकांचे पुण्यास पत्र लंडन ३० जानेवारी १९१९ चिरोल केसमध्ये माझी जवानी चालू आहे. पॅरिसला जाण्याकरता पासपोर्ट मागितले होते पण ते मिळाले नाहीत.