पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र (२९) डी. एन्. बानर्जी यांचे टिळकाना पत्र लंडन २० जानेवारी १९१९ डेलीमेलच्या संपादकाना भेटलो. त्यांचे आमचे पैशाचे ठरल्यास वर्तमान- पत्रात जागा राखून ठेविता येईल असे ते म्हणाले. मी या वाटाघाटीत तुमचे नाव सांगितले नाही. हिंदुस्थानासंबंधी काही माहिती पाठविली तर ती ते पत्रात घालतील पण ते हिंदुस्थानच्या बाजूने स्पष्टपणे लिहिणार नाहीत. मॅसिंगहॅम यांची व तुमची भेट व्हावी म्हणजे बरे असे त्यांचे सेक्रेटरी म्हणत होते. डेली न्यूज पत्राचे संपादक गार्डिनर यांच्या सेक्रेटरीचे तुमच्याबद्दल पत्र आले आहे. डेली क्रॉनिकलबद्दल मात्र विश्वास नाही. कारण ते लाइड जॉर्ज यांचे पत्र आहे. सुप्रसिद्ध लेखक एच्. जो. वेल्स यांचा मात्र काही उपयोग कदाचित् होईल. (३०) एस आर. बम्मनजी यांचे टिळकाना पत्र. भूमध्य समुद्र २४ जानेवारी १९१९ मी लंडनला एकदम येत नाही. प्रथम पॅरिसमध्ये ८/१० दिवस राहीन. तेथे शांतता परिषदेची मौज पहाण्याची इच्छा आहे. त्या कामी लॉर्ड सिंह आणि बिकानेरचे महाराज हे मदत करणार आहेत. तुमच्याकरिता तुपाचा डबा एक मजजवळ दिला आहे. तरी बोट धक्क्याला लागेल तेव्हा तो घेऊन जाण्यास सांगावे. आमच्या जहाजावर लेडी चेम्सफर्ड या आहेत. त्या विलायतेस निघाल्या आहेत. त्या मला म्हणाल्या तुम्ही लंडनला याल तेव्हा टिळकाना घेऊन आमच्याकडे चहा घेण्याला याल का ? मी त्याना होय म्हटले आहे. बाई फार हुषार आहे. सहानुभूति तर ठरलेलीच आहे ! (३१) टिळकांचे गोखले याना पत्र लंडन २३ जानेवारी १९१९ तुमची पत्रे पोचली. विलिंग्डन स्मारकाचा फजिता झाल्याचे वाचले. शेवटी जिना याना आम्ही सुरतेस जे केले तेच करावे लागले. 'प्रारब्धस्यान्तग- मनम्' हे वचन जिनाना आता पटले म्हणावयाचे. सर सत्येंद्र प्रसन्न सिंह यानाः लॉर्ड केले आहे. नेमस्ताना एक नवे दालन खुले झाले म्हणावयाचे. काळा शेवटी गोन्यात शिरला असे 'सॅटरडे रिव्ह्यू' ने म्हटले आहे. स्वयंनिर्णयाचे सोवळे: भांडे इकडून तिकडून कोणीकडून तरी शांतता परिषदेच्या द्वारातून आत टाकून द्यावे असा प्रयत्न सुरू आहे. हिंदुस्थानाला परिषदेत दोन खुर्च्या मिळाल्या आहेत पण त्यांचा आम्हाला उपयोग नाही. काँग्रेस व होमरूल लीगचे अध्यक्ष यानीही परस्पर परिषदेला तारा करून पहाव्या. बॅपटिस्टा आता येथून निघणार. त्यानी इकडे अठरा महिने काढल्यावर त्याना आणखी राहा असे आम्हाला.