पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० लो० टिळकांचे चरित्र भांग ५ (२६) जिलबर्ट क्लोज यांचे टिळकाना पत्र पॅरिस १४ जानेवारी १९१९. प्रे. बिल्सन याना आपण पाठविलेले पत्र मिळाले. त्यांची आठवण ठेवून त्याना तुम्ही लिहिले याबद्दल ते आभारी आहेत. त्यानी तुम्हाला आश्वासनपूर्वक असे कळविण्याविषयी मला सांगितले आहे की हिंदुस्थानाला स्वयंनिर्णयाचा हक्क मिळण्याच्या प्रश्नाचा विचार योग्य अधिकारी लवकरच करणार आहेत. (२७) टिळकांचे केळकराना पस लंडन १६ जानेवारी १९१९ येथील कामाचा पुढील अहवाल पाठविला आहे. ब्रि. काँ. कमिटीने आम्हाला विरोध करून आमचे पाय मागे ओढू नयेत इतकी तरी काही खटपट काँग्रेसच्या अधिकाऱ्याकडे कराल की नाही ? काल मी एक तार प्रसिद्ध केली. तीत लिहिल्याप्रमाणे शांततापरिषदेकडे हिंदुस्थानच्या तक्रारी काँग्रेसकडून कळवि- ण्याची काही व्यवस्था झाली तर पहा. (२८) केळकर यांचे बेझंटबाईना पत्र पुणे १७ जानेवारी १९१९ भेद कॉंग्रेसमधील आपल्या दोन होमरूल पक्षाच्या मतात फारच सूक्ष्म आहे. असे असता त्याचा वर्तमानपत्रातून विनाकारण गवगवा होतो. पण अजू- नहि ही गोष्ट सुधारता येईल असे वाटते. आपण शिष्ट मंडळात गेला तर बहुधा पुढारीपणाचा मान आपणाकडेच येईल. शिवाय विलायतेत टिळक हे एकटेच असल्यामुळे ज्या लोकापासून आपणाला नेहमी उपसर्ग होतो असे वाटते ते लोक त्यांच्याबरोबर तेथे नाहीत. विलायतेत प्रधानमंडळात जसा किरकोळ मतभेद असतो तथापि सर्वजण मिळून एकच गोष्ट अंमलात आणतात त्याप्रमाणे प्रांतिक स्वातंत्र्याचे बाबतीत थोडथोडा मतभेद असला तरी इतर सर्व मागण्या आपण व टिळक याना एकमुखाने मांडता येतील. सुधारणेच्या योजनेसंबंधाने आपणच पूर्वी म्हणाला होता की त्या देण्याला इंग्लंडच्या योग्यतेच्या नाहीत व घेण्याला हिंदुस्थानच्या योग्यतेच्याहि नाहीत. त्याचीच मी आपणाला आठवण करून देतो. टिळकांचे व काँग्रेसचे मत झाले तरी सर्वस्वी जुळते असे कोठे आहे ? तथापि कोणत्याहि मतभेदात आपण थोडे मिळते घेण्याचा प्रयत्न केला तर मिळते घेता येते आणि मतभेदावर जोर दिला तर जमत नाही. माझे म्हणणे कदाचित् आपणाला पटणार नाही पण सुचले ते लिहिले आहे. गैरसमज होऊ देऊ नये. त्यातून आपण माझ्यापेक्षा दोन पिढ्यानी वडील आहा म्हणून मी केवळ सुचले आहे ते सादर केले असेच माना.