पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र (२३) टिळकांचे केळकराना पत्र लंडन ९ जान्युआरी १९१९ १९ काही पत्रे व वर्तमानपत्रे मिळाली. अजून आमचे टपाल केव्हा केव्हा फोडूनच येते. एकदा चार हजार पौंड व एकदा पाच हजार पौंड पाठविलेत ते पोचले. होमरूल लीगच्या कामाचा अहवाल पाठविला आहे. कोर्टे ११ जान्यु- आरीला उघडतील. मग चिरोल केसची तारीख कोणती नेमतात ते कळेल. सर जॉन साहेबानी आमचे वकीलपत्र स्वीकारले आहे. पण समक्ष भेटून बोलणे चालणे अद्यापि व्हावयाचे आहे. मार्सेलवरून आता टपाल जाऊ येऊ लागले. तेव्हा यापुढे पत्रे लवकर मिळतील. येथे आम्ही जी हस्तपत्रके व लहान पुस्तके काढली त्यांच्या प्रती पाठविल्या आहेत. आम्ही मजकूर ठरविल्याप्रमाणे बॅपटिस्टा यानी लिहिला आहे. त्यात लंडन टाइम्सचे नाव नाही पण त्याच्या टीकेला उत्तर आहे. मनरो - डॉक्ट्रिनचा उल्लेख का केला याची कारणे तुम्हाला कळून येतीलच. दिल्ली येथील राष्ट्रीय सभेने शांतता परिषदेला पाठविण्याच्या शिष्टमंडळात माझी निवड केली हे एका अर्थी बरे झाले. त्यामुळे मि. पोलॉक यांचा मला जो येथे विरोध होत आहे त्याला परस्पर उत्तर मिळेल. हिवाळा आहे पण फारसा बाधत नाही. (२४) कार्ल हीथ यांचे टिळकाना पत्र लंडन ९ जानेवारी १९१९ स्वयंनिर्णयावर तुमच्याकडून आलेले पत्रक पावले. पण आमच्या कौंसि लाने असे ठरविले की हे पलक आम्ही परस्पर वाटू नये. तथापि असेहि ठरले की अंतरराष्ट्रीय परिषदेचा विचार करण्याकरिता जे कमिशन नेमण्यात आले आहे त्या कमिशनने या प्रश्नाचा विचार करावा अशी विनंति करावी. कौंसिल- मध्ये त्याचा विचार झाल्यावर कौन्सिल स्वतःचे म्हणून एक पत्रक काढील. ही रीति अधिक उपयुक्त असून आपणाला पसंत पडेल अशी आशा आहे. (२५) जोसेफिन रॅन्सम यांचे टिळकाना पत्र लंडन ९ जानेवारी १९१९ स्वयंनिणर्याचे पलक पोहोचले. त्यातील विचारसरणी व मांडणी चांगली आहे. चित्रे मात्र आम्हाला आवडली नाहीत. ते पत्रक आम्ही वाटावे असे आपणास वाटत असेल तर दोनशे प्रती पाठवा. माझ्या पतीना निवडणुकीत अपयश आले पण त्याबद्दल त्याना काही वाईट वाटत नाही. ते लिबरल पक्षाचे उमेदवार म्हणून उभे होते. लेबरपक्षाचे म्हणून नव्हते. तुमच्या व्याख्यानाकरिता आम्ही सभा भरवावयाची असे ठरविले आहे. ता. २५ फेब्रुवारीला कॅक्स्टन हॉल मिळेल, टि० उ... २६