पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ गोपाळराव गोखले यांचा मृत्यु २३ प्रमाणबद्ध असत. आधार व आकडे पाहून पारखून घेतलेले असावयाचे विषयांतर कोहि नसावयाचे. शब्द मेजके रेखीव तोलीव असे असावयाचे. प्रत्येक वाक्या- गणिक उद्दिष्टाचे पाऊल पुढे पडत असावयाचे. आणि या सर्वावर प्रांजलपणा व मृदुलपणा ही बारीक हाताने पसरलेली असावयाची. पण उलट त्यांच्या भाषणात विनोद सहसा कोठे आढळावयाचा नाही. ज्याप्रमाणे डॉ. रासबिहारी घोष वगैरेंच्या भाषणात अभिजात वाङ्मयाचे संदर्भ व रुचिर ध्वनि पदोपदी उमटलेले दिसतात तसे यांच्या भाषणात आढळत नसत. वक्तृत्वाची जी एक ठरीव कल्पना आहे त्या दृष्टीने गोखल्याना कदाचित् वक्तेहि म्हणता येणार नाही. पण मन वळविणे किवा दुसऱ्यांना आपलेसे करणें हा जो वक्तृत्वाचा हेतू व परिणाम तो सिद्ध करण्यात इतर नामांकित वक्त्यापेक्षाहि गोखल्यांचा हातखंडा असे. याचे कारण एकच कीं त्यात प्रसाद प्रांजलपणा बुद्धिमत्ता व कळकळ ही खेचून भरलेली असत. यातच त्यांचा वर्ण व बाह्यरूप यांची भर पडे. व त्याहिपेक्षा खरा गुण म्हटला म्हणजे त्यांच्या भाषणातच काय पण ज्यांना एकदा गुरुजन किवा नेते त्यानी मानले त्यांच्या विषयीच काय पण समोरच्या प्रेक्षकाविषयीहि त्यांची विनयबुद्धि प्रगट होई. त्यांच्या भाषणांत आवेश असला तरी अपशब्द नसे आणि मर्मज्ञपणा असला तरी कुचाळी नसे. हे जे त्यांचे गुण सभापांडित्यात तेच खाजगी संभाषणातहि दिसून येत. यामुळे नेमस्त पक्षाकडून परदेशी पाठविण्याला जर कोणी एकच मनुष्य योग्य असेल तर ते गोखले असे त्या पक्षाने कायमचे ठरवून टाकले होतें आणि ते सार्वजनिक कार्याला दिवसभर वाहिलेले व पडेल ते काम अंगावर घेण्याला तत्पर असे असल्यामुळे इतर धंदेवाईक वकिल सॉलिसिटर व्यापारी कारखानदार शाळुमुत्सद्दी व पर्यकपंडित याना त्यांच्यापुढे हारच खावी लागे. पण इतके गुण असूनहि त्यांच्या ठिकाणी होती तशी उज्ज्वल देशभक्ति, कर्तव्यनिष्ठा व स्वार्थत्यागबुद्धि नसती तर त्या गुणाचे तेज जनतेवर पडले नसते. त्यांच्या प्रतिपक्षाना देखील हे त्यांचे दुहेरी गुण मान्य होते. पक्षाभिमानामुळे टिळकांचे 'गुण उघडपणे मान्य करण्याला नेमस्त हे खळखळ करीत व त्यांची जीभ किंवा लेखणी होईल तितके अंग चोरी. तोच प्रकार गोखल्यांच्या संबंधाने राष्ट्रीयपक्षाचाहि होत असे. आणि दुर्दैवानें जन्मभर या दोन पक्षांच्या मूर्धा- भिषिक्त पुढाऱ्यांचे धावते युद्ध चालू राहिल्यामुळे आणि परस्परानी परस्परांविषयी मर्यादेबाहेर अनादर दाखविल्यामुळे अनुयायांच्या वर्तनात अनादराला अ व द्वेष याचेहि स्वरूप आले होते. पुष्कळाना असे वाटे की हे दोन पुढारी एका . बाजूला राहून एकच धुरा मानेवर घेऊन काम करतील तर काय बहार होईल ! पण अशी अपेक्षा करणे म्हणजे सूर्यचंद्र एकाच वेळी आभाळात राहून सारखेच प्रकाशमान व्हावे अशी अपेक्षा करण्यासारखेच व्यर्थ होते. एका क्षितिजाच्या दोन • टोकावर राहूनच त्यानी आपापले काम आपापल्या निम्म्या भागापुरते करावे • असाच ईश्वरी संकेत होता. आता ते दोघेहि कालवश झाल्यानेच त्यांची नावे