पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ तुम्ही नव्हता. एवढेच गौण होते ! लक्ष्मीनारायणाच्या धर्मशाळेतच फिरून उतरलो होतो. पंडित मदनमोहन यांच्या मिरवणुकीला सरकारने हरकत घेतली. विषयनियामक मंडळात ठरावाचे मसुदे झाले ते झटबाईच्या सहविचारानेच झाले. एका ठरावात प्रांतिक स्वातंत्र्य मिळण्याला पूर्वी सहा वर्षे मुदत घातली होती तीहि आता काढून टाकण्यात आली. दुसरे दिवशी पंडितजींचे अध्यक्ष म्हणून भाषण झाले. पण मौज ही की तुमचे नाव एकदाहि कोठे त्यानी घेतले नाही. वास्तवीक तुम्ही नाकारलेल्या जागी ते अध्यक्ष होऊन बसले होते म्हणून या गोष्टीचा उल्लेख त्यानी करावयास पाहिजे होता. बेझंटबाईनी ठरावांच्या मसु- द्याला बराच विरोध केला. दास व चक्रवर्ती हे आपल्या बाजूला होते. पंडितजींचे धोरण काहीच नव्हते. दिवसामागून दिवस लोटत होते. पण निकालात काहीच निघत नव्हते. असे सहा दिवस गेले. जिना कॉंग्रेस व मुस्लिमलोग या दोहोना संभाळून चालत होते. पण विषयनियामक मंडळातील मुसलमान प्रतिनिधीनी जिना याना मधून मधून धोका दिला. शेवटी आमच्या बाजूला बहुमत मिळाले. बेझंटवाई फार रागावल्या. आणि दुसरे दिवशी मालवीयजींच्या घरी आम्हाला म्हणाल्या की तुम्ही टिळकांचे लोक माझा फार द्वेष करिता. त्या असेहि म्हणाल्या की टिळकाबरोबर मी कोणत्याहि शिष्टमंडळात जाणार नाही. पूर्वी मद्रासेस आपण गेलो तेव्हा त्यानी आपणाशी जे स्नेहाचे वर्तन ठेविले त्याशी हे सगळे विसंगत दिसले. " प्रागतिक नेमस्त पक्ष' नावाचा एक पक्ष काढण्याचा त्यांचा विचार दिसतो. विलायतेतील परिषदाना प्रतिनिधि म्हणून प्रथम तुमचे एकट्या- चेच नाव घातले होते. पण नंतर हसन इमाम यांचेहि नाव जोडण्यात आले. शिष्टमंडळ निवडण्याकरिता एक कमिटी नेमण्यात आली आहे. कॉंग्रेसचे पुढील वर्षांचे सेक्रेटरी नेमताना बराच गोंधळ झाला. म्हणून आम्ही पटेल व केळकर यांची नेमणूक केली. पण केळकराना डेप्युटेशन कमिटीचे काम शिवाय स्वयं- निर्णयाचा अर्ज लिहिण्याचे काम, आणि खुद्द डेप्युटेशनबरोबर जाण्याचे काम आधीच दिलेले असल्यामुळे त्यानी आपणाला कॉंग्रेस सेक्रेटरीची जागा नको म्हणून सांगितले. तेव्हा त्यांच्या जागी पंडित गोकर्णनाथ मिश्र याना नेमिले, पंडितजीनी आपल्या पहिल्या भाषणात तुमचा मुळीच उल्लेख केला नाही या- बद्दल काही लोक त्याना बोलले असावे असे वाटते. कारण पंडितजी यानी आपल्या शेवटच्या भाषणात तुमच्याबद्दल उल्लेख केला. पण तोहि असा तसाच. राष्ट्रीय सभेला पुष्कळ लोक आले होते. आणि ठरावाच्या दृष्टीने प्रगति दिसली. अनेक उपसूचना भर सभेत मांडण्यात आल्या व त्यावर वादविवाद चांगला झाला. विरोधी मतेहि लोकानी शांतपणे ऐकून घेतली. बेझंटवाईंच्या उपसूचनेला अवघी चार मते मिळाली. काँग्रेसची एकंदर हकीकत थोडक्यात अशी आहे.