पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र १७ आहेत या गोष्टीचा आपणास फायदा घेता येईल, साम्राज्यात एक मोठी परस्पर साहायकारी संस्था काढावी अशा मताचा मी आहे. तरी या संबंधाने आपले विचार कळवावे. पुढील वर्ष हिंदुस्थानाला सुखकर जावो अशी माझी प्रार्थना आहे. ( २० ) लजपतराय यांचे टिळकाना पत्र न्यूयॉर्क २६ डिसेंबर १९१८ हेन्री हॉचनर नावाचा एक गृहस्थ हल्ली इकडे आला आहे. त्याने सर सुब्रम्हण्य अय्यर यांच्याकडून अमेरिकन प्रेसिडेंटला एक पत्र आणले व प्रेसिडेंटने त्याप्रमाणे काही गोष्ट केली असे म्हणतात. पण ते खरे आहे असे वाटत नाही. त्या पत्रातील सारांश इकडील वर्तमान पत्रातून प्रसिद्ध झाला होता. पण हॉचनर याने बेझंटवाईला जी हकीकत कळविली तीत फार अतिशयोक्ति असावी. हॉच- नर याची व माझी कधी गाठ पडली नाही. हा गृहस्थ फ्रान्सला जाण्याचे बोलत आहे. पण मला कशात काही तथ्य दिसत नाही. ( २१ ) इ. वॉलेस यांचे बॅपटिस्टा याना पत्र लंडन ३० डिसेंबर १९१८ 'दि केस फॉर इंडियन होमरूल' हे पुस्तक मी वाचले. ते फारच उत्कृष्ट रीतीने लिहिलेले आहे व त्यातील युक्तिवाद पटण्यासारखा आहे. त्यातील मतांचा प्रसार करण्याला मी मदत करीन. पण इकडील मतप्रसार हे फार खर्चाचे काम आहे. इकडे हिंदुस्थानच्या कामात कोणी लक्ष घालीत नाही. आणि इकडे तर जाहिरातीशिवाय व मतप्रसाराखेरीज काहीच काम होत नाही. एका वर्षाचा खर्च म्हणून विचारलात तर तो कमीत कमी ६००० पौंड लागेल. पण एकादा साधा स्टोअर किंवा नवीन छानछोकीचे दुकान हे घेतले तरी त्याचा जाहिरातीचा एक सालातील खर्च या रकमेच्या दसपटहि होतो हे ध्यानात ठेवा. त्यातल्या त्यात दुसरी अडचण अशी की इतका खर्च करूनहि अशी खबरदारी इकडे घ्यावी लागते की इकडच्या कोणीहि मतप्रसाराचे काम पत्करले तरी तो हिंदी राष्ट्राचा एजंट आहे असे लोकाना दिसता कामा नये. जणु काही स्वतंत्र परोपकारी बुद्धीने व स्वतंत्र साधनानी मतप्रसार सुरू आहे असा वाहणा झाला पाहिजे ! (२२) दादासाहेब खापर्डे यांचे टिळकाना पल अमरावती ५ जानेवारी १९१९ दिल्लीहून काल परत आलो. होमरूल स्पेशल ट्रेनने डॉ. मुंजे यांच्याबरोबर दिल्लीकडे जाताना प्रवास केला. सर्व थाट पूर्वीप्रमाणेच होता. पण आगगाडीत