पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ तासांची रात्र आहे. घरात शेगड्या असल्याने उष्णतामान ५४ ते ५८° असते. पण बाहेर ३८ पासून ४० पर्यंत असते. कदाचित ते ३२ पर्यंत म्हणजे शून्य उष्णतामानापर्यंत जाईल. ( १७ ) पोलॉक यांचे मिस व्हिलियर्स याना पल लंडन २१ डिसेंबर १९१८ तुमच्या होमरूल लीगने हस्तपत्रक काढले ते पाहिले. एक गोष्ट तुम्हाला माहीत नाही असे दिसते ती ही की टिळकाना येथे कोणताहि प्रातिनिधिक स्वरू- पाचा अधिकार नाही. ते येथे व्यक्तिशः आपल्या कामाला आले आहेत. त्याना राष्ट्रीय सभेच्या नावाने काही बोलण्यान्त्रा अधिकार नाही. येथे येऊन कोणत्याहि एका राजकीय पक्षाला हाताशी धरून काम करावे असे काँग्रेसने कोणास सांगि- तले नाही, काँग्रेसचा तसा ठराव नाही. टिळकाना काँग्रेसचे जुने ठराव घेऊन फारतर त्याप्रमाणे मतप्रसार करता येईल. टिळकांचे अधिकाराचे अतिक्रमण काँग्रेसच्या कानावर घातले पाहिजे. व तिने त्यांच्या कृत्याला संमति दिली तर हिंदुस्थानातील दोन्ही पक्षात एकी कधीहि होणार नाही. मला खासगी रीतीने असे कळले आहे की सुधारणाविरुद्ध येथे एक मोठा कट होऊ पाहात आहे. आणि त्याचा प्रतिकार करू पाहणाराना टिळकांच्या या धोरणाने फार अडथळा होईल. माझे हे पत्र लॅन्सवरी याना दाखवा. या गोष्टीसंबंधाने मो इंडिया पत्रात चर्चा करणार आहे. टिळकांच्या या धोरणाचा निषेध हिंदुस्थानातहि होईल अशी मला खात्री वाटते. (१८) हाईडमन यांचे टिळकाना पत्र लंडन ता. २२ डिसेंबर १९१८ हिंदुस्थानाला स्वयंनिर्णयाचा हक्क जरूर असला पाहिजे. इतर राष्ट्राना तो असता हिंदुस्थानला तेवढा तो का नसावा ? तुम्ही या विषयावर योजून लिहि- लेल्या पुस्तकाची टाइप केलेली प्रत मी पाहिली. माझ्या दृष्टीने ते फार चांगले आहे. ( १९ ) जे. जी. निकोल यांचे टिळकाना पत्र ब्रेडफर्ड ता. २३ डिसेंबर १९१८ तुम्ही ब्रेडफर्डला केव्हा याल व होमरूलचा इकडील एक सभासद म्हणून तुमच्याशी माझे हस्तांदोलन केव्हा घडेल याची मी वाट पहात आहे. कॉटन एक्साइज ड्यूटी व मिठावरील कर या दोहोंसंबंधाने मला तुमच्याकडून माहिती घेण्याची इच्छा आहे. अमेरिकेहून जो माल येतो त्यापैकी काही हिंदुस्थाना- कडून आणता येण्यासारखा आहे. हल्ली वसाहतीतील अनेक लोक येथे आले