पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र (१३) सिडने वेब यांचे टिळकाना पत्र लंडन ता. १० डिसेंबर १९१८ १५ फेबिअन सोसायटीच्या सभा दर शुक्रवारी एसेक्स हॉलमध्ये भरतात. कोणी अशी सूचना केली की एका शुक्रवारी तुमचे सभेपुढे व्याख्यान व्हावे. या सूचनेचा आमच्या कमिटीने मोठ्या उत्सुकतेने स्वीकार केला. तरी शुक्रवार ता. १४ फेब्रुवारी रोजी तुम्ही हे व्याख्यान द्याल काय ? त्या महिन्यातील ही आमची पहि लीच सभा आहे व या तारखा तुमच्या चिरोल खटल्यातील तारखांच्या आड येणार नाहीत अशी मला आशा आहे. तरी हे निमंत्रण स्वीकारल्याचे व ही तारीख सोईची असल्याचे कळवावे. (१४) ए. सी. सरकार यांचे टिळकाना पत्र लंडन ता. ११ डिसेंबर १९१८ येथील नॉर्थब्रुक सोसायटीतील लषाने अशी इच्छा मजकडे प्रकट केली आहे की त्या बापुढे होमरूल या विषयावर आपले एक व्याख्यान व्हावे. भूपेंद्र बसू देवधर वगैरे लोकांची व्याख्याने नुकतीच झाली आहेत. आपल्यावरील भाषण- बंदी नुकतीच निघाल्याचे ऐकून फार आनंद झाला व म्हणूनच ही विनंति करीत आहो. (१५) हाइडमन यांचे टिळकाना पत्र लंडन ता. १२ डिसेंबर १९१८ तुम्ही जे निरनिराळे ठराव मजकडे पाठविले त्याबद्दल मी आभारी आहे. ह्यांचा मी अवश्य उपयोग करीन. हिंदुस्थानच्या बाबतीत माझे पूर्वीचे मत बद- ललेले नाही. आणि तुम्ही आता येथेच आहा तेव्हा या गोष्टीची प्रचिति तुम्हास येईलच. हिंदुस्थानसंबंधाने इंग्लंडच्या जुन्या धोरणात पूर्णपणे फरक झाल्याचे पाहण्याला तुम्ही आम्ही जगू अशी मला आशा आहे. चाळीस वर्षांपूर्वी सॅलस्- बरी इडली ब्रुक स्टॅनहोप मॅलेट वगैरे लोकानी असाच प्रयत्न केला होता. पण १८८० च्या निवडणुकीपासून ते काम मागे पडले. या लोकानी योजलेल्या सुधार- णांच्या मानाने माँटेग्यू साहेबांच्या सुधारणा काहीच नाहीत असे मला वाटते. (१६) टिळकांचे धोंडोपंताना पत्र लंडन ता. १८ डिसेंबर १९१८ आमची सर्वांची प्रकृति बरी आहे. येथली थंडी मला इतकी सोसेल अशी कल्पना नव्हती. येथे सूर्योदय सकाळी आठ वाजून पाच मिनिटानी होतो. व दुपारी तीन वाजून ४९ मिनिटानी मावळतो. सध्या आठ तासांचा दिवस व १६