पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ तौही गोष्ट मिळत नाहीशी झाली म्हणजे तिची किंमत कळून येते. तुमच्यावर प्रेम करणारा तुमचा मुलगा असा माझा हक्क आहे. आणि अज्ञानाने माझ्या हातून पूर्वी जे दोष घडले असतील त्याची तुम्ही मला क्षमा केली पाहिजे. (१०) डॉ. मुंजे यांचे टिळकाना पत्र नागपूर ३ डिसेंबर १९१८. नारायणराव वैद्य अपीलात सुटले हे आपण ऐकलेच असेल. मुख्य प्रधान बोनर लॉ आणि ॲस्किथ यानी असे जाहीर केले आहे की हिंदुस्थानाला दिलेली वचने विलायत सरकार पाळील. पण या जाहीरनाम्याचे खरे मर्म काय ? आपणाला शांतता परिषदेकडे वकील म्हणून पाठवावे अशी खटपट इकडे सुरू आहे. आणि तहाची वाटाघाट होईल तेव्हा लंडन येथे काँग्रेसची बैठक करावी अशी जी सूचना पुढे आली आहे ती मला फार पसंत वाटते. प्रे. वुइलसन यांच्या मनावर या गोष्टीचा परिणाम विशेष होईल. काँग्रेसमधून निघून गेल्या- बद्दल नेमस्ताना पश्चात्ताप होत असावा असे वाटते. नारायणराव वैद्यांचे अपील दासबाबूनी फार चांगले चालविले व ते असे म्हणत होते को करंदीकर यानी उलट तपासणी फार चांगली केली. (११) हेंडरसन यांचे टिळकाना पत्र लंडन ६ डिसेंबर १९११ आपण पाठविलेले दोन हजार पौंड पोचले त्याबद्दल पावती यासोबत पाठ- वीत आहे. आपल्या या उदार देणगीबद्दल आमची लेबर पार्टी आपली फार आभारी आहे. हिंदी लोकांच्या स्वराज्यविषयक ज्या आकांक्षा आहेत त्याना आमची सहानुभूति आहे हे मला आपणास सांगितले पाहिजेच असे नाही. आणि या- पुढेहि आमच्या पक्षाच्या हातून आपणाला जी मदत करता येईल ती अवश्य करू. ( १२ ) कार्ल हीथ यांचे टिळकाना पस लंडन ता. ९ डिसेंबर १९१८ आपण भेटावयाला आला तेव्हा मी बाहेर गेलो होतो याबद्दल वाईट वाटते. तहासंबंधाने नॅशनल कौंसिलने व्यवस्था चालविली आहे त्यात हिंदुस्था- नची खास अशी काही व्यवस्था अजूनपर्यंत केलेली नाही. हिंदुस्थानचे अमूक म्हणणे म्हणून मांडण्यात आलेले नाही पण 'नॅशनल पीस कौंसिल'चा जनरल सेक्रे- टरी म्हणून मी तुम्हाला असे कळवितो की स्वयंनिर्णयाचे तत्त्व हिंदुस्थानाला लावण्याविषयीची जी मागणी आहे ती योग्य असून या कौंसिलच्या सभासदांची त्याला पूर्ण सहानुभूति आहे. तुमचे नाव मी फार ऐकले आहे हे लिहावयासच नको. तुमची गाठ पडावी याविषयी मी उत्सुकतेने वाट पहात आहे.