पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र १३ पुरुषाप्रमाणे स्त्रियानाहि त्यांच्या अधिकाराने मतदारी मिळावी अशी आमची खटपट आहे. तरी आम्हाला या कामी साहाय्य कराल अशी आशा आहे. (७) शंकर सरण यांचे टिळकाना पत्र ऑक्सफर्ड ता. २४ नोव्हेंबर १९१८ आपला येथील खटला संपेपर्यंत आपण भाषण करीत नाही हे ठीकच आहे. म्हणून तूर्त आम्ही आपणाला त्रास देऊ इच्छित नाही. तरी आपण फक्त भेट देऊन जावे. या देशात आपण असता आपणाशिवाय आमची परिषद कशी भरावी ? सभेत कोठे हजर असता आणि निवडणुकीचे काम सुरू असता उमेद- वाराना हिंदुस्थानच्या वतीने प्रश्न विचारावे असे आपण आम्हाला सुचविले. त्याप्रमाणे आम्ही करीत आहो. पार्लमेंटातील ८/१० मेंबर्स गाठून त्यांच्या दिम- तीला एकेक हिंदी मनुष्य देऊन त्याना माहिती पुरवावी असे मनात येते. इकडे येऊन अभ्यास संपविलेल्या मुलानी या कामाकरिता काही दिवस का घालवू नयेत ? त्याना आठवड्याला ३/४ पौंड द्यावेत म्हणजे झाले. काँग्रेसने अशी योजना का करू नये ? (८) टिळकांचे केळकराना पत्र होमरूलच्या कामास सुरवात केली. लंडन २७ नोव्हेंबर १९१८ कामाला बऱ्याच अडचणी आहेत. लेबर पक्षास सुमारे २००० पौंड दिले. त्यामुळे आणखी जास्त रकमेची जरूरी लागेल. सध्या येथे इलेक्शनची गडबड चालू आहे. तथापि आम्ही आमचे काम पुढे रेटीत आहो. माझ्या सॉलिसिटरकडून बादशहाना मी अर्ज केला. त्यामुळे सरकारने घातलेली माझ्या हालचालीवरील बंधने त्यानी दूर केली आहेत. काँग्रे- सचा रिपोर्ट व वर्तमानपत्रांचे उतारे रजिस्टरपत्राने पाठवा. ( ९ ) जगन्नाथ महाराजांचे टिळकाना पत्र मुंबई ३० नोव्हेंबर १९१८. आपण विलायतेला सुखरूप पोहोचला हे ऐकून अतिशय आनंद झाला. असेच सुखरूप व यशस्वी होऊन हिंदुस्थानाला परत यावे व आम्ही आपले स्वागत करावे अशी इच्छा आहे. कॅथीड्रल हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. अभ्यास सुरू झाला. कॅडेट कोअरकरता मला एक बंदूक पाहिजे ती मी घेऊ का ? याकरिता केळकरांचे बरोबर जाऊन मी कलेक्टरला भेटणार आहे. आपण मला आखून दिलेल्या अंदाजाबाहेर माझा खर्च जात नाही. कारणपरत्वे गंगाधर- रावांचा सल्ला घेतो. आपण सांगितल्याप्रमाणे व्यायाम घेतो व ईश्वरध्यानहि करितो. आपण येथून गेला ही कल्पना मनात येऊन वरचेवर दुःख होते. कोण-