पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ लो० टिळकांचे चरित्र (४) टिळकांचे धोंडोपंताना पत्र भाग ५ लंडन १३ नोव्हेंबर १९१८ आम्हाला येथे येऊन १५ दिवस झाले. अद्याप फारशी थंडी नाही. घरा- बाहेर उष्णतामान ४० डिग्री व आत सुमारे ५०-५५ डिग्री इतके असते. सिंह- गडापेक्षा येथली हवा जास्त थंड आहे असे वाटत नाही. अद्याप केसची तारीख लागली नाही. सर जॉन सायमन यानी आमचे वकीलपत्र घेतले आहे. कार्सन हे विरुद्ध बाजूला आहेत. त्याना असे वाटते की " मी प्रधानमंडळात गेलो तर बयाणा म्हणून अशीलांच्याकडून घेतलेले सर्व फी- पैसे वगैरे रद्द होतील. " आसिटिसवर सह्या झाल्या म्हणून लंडनमध्ये मोठा उत्सव सुरू आहे. बिचाऱ्या हिंदुस्थानाला या प्रसंगी न चिसोत म्हणजे झाले. वैद्य खटल्यातून निर्दोष सुटले आणि केळकर म्युनिसिपालटीचे अध्यक्ष निवडून आले हे वाचून फार आनंद वाटला. ( ५ ) शंकर सरण यांचे बैपटिस्टा याना पल ऑक्सफर्ड १७ नोव्हेंबर १९१८ आमच्या परिषदेला येण्याविषयी टिळकाना लिहिले आहेच. हेतु इतकाच की या देशातील सर्व हिंदी विद्यार्थी एकत्र जमतात तेव्हा त्यांची व टिळकांची स्वस्थपणे गाठ पडावी. त्यांच्या बरोबर करंदीकर केळकर वगैरे स्नेहीहि यावे. परिषदेच्या खचीबद्दलची जबाबदारी आम्ही पत्करिली आहे. ऑक्सफर्ड येथील मज- लसीने टिळकाना आमंत्रण दिले काय ? तीन वर्षेपर्यंत असे घडले की मजलशीच्या अध्यक्षाच्या निवडणुकीला जो उभा राहिला त्याला इतर रीतीने पुष्कळ मते मिळण्या- सारखी असता तो टिळकांचे स्वागत करू शकणार नाही असे म्हटल्यावरून त्याला विरोध झाला. यंदाच्या अध्यक्षाने टिळकांचे स्वागत करण्याची खूप तयारी केली होती पण त्याला इन्फ्लुएन्झा होऊन तो वारला. तथापि या टर्मला नाही तर पुढल्या टर्मला मजलसीकडून टिळकाना आमंत्रण जाईल अशी मला आशा आहे. ( ६ ) लेडी व्हिलियर्स यांचे टिळकाना पत्र लंडन नोव्हेंबर १९१८ फ्रेंचाइज कमिटीचे काम चालू आहे. स्त्रियाना मतदानाचा हक्क मिळणे योग्य आहे. स्त्रिया तो हक्क मागत आहेत. आणि त्यानी आपले शिष्टमंडळ माँटेग्यू साहेबाकडे पाठविले आहे. काँग्रेसकडेहि मागणी केली आहे. आणि काँग्रेस व मुस्लिम लीग दोघानीहि अनुकूल ठराव केले आहेत. कित्येक प्रांतातून त्याना ही मतदारी मिळाली आहे. 'दर माणशी मत' असे केव्हा होईल तेव्हा होवो. पण तूर्त