पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र ११ शब्दानी गोळाबेरीज हकीकत देऊन उभे राहील असे वाटत नाही. शिवाय हकीकत वाचून मग त्याच्या आधाराचा विचार करीत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष आधा- रच वाचकापुढे असले म्हणजे, साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहिलेल्या माणसा- सारखी ज्याने त्याने आपली हकीकत आपल्या तोंडाने प्रतिज्ञेवर सांगितल्याप्रमाणे ती वाचकाना मनोरंजक व मनावर स्पष्ट ग्रह उमटविणारी होईल अशा समजुतीनेच तशी योजना केली आहे. (१) टिळकांचे धोंडोपंतास पत जित्राल्टर २० आक्टोबर १९१८ आज सकाळी आम्ही सर्व येथपर्यंत सुखरूप आलो. प्रवास अपेक्षेपेक्षाहि चांगला झाला. कोणी आजारी वगैरे पडले नाहीत. नामजोशी हे करंदीकर यांचे साह्याने जेवणाखाणाची व्यवस्था नीट करीत असतात. त्यामुळे हिंदु पद्धतीचा आहार मिळण्यास अडचण पडत नाही. पोर्ट सय्यदला आम्हास चार दिवस थांबावे लागले. पण त्याचा वचपा बादशाही थाटाने भरून निघाला. पोर्ट सय्यदपासून काही आरमारी अधिकारी जिब्राल्टरला जाणार होते. म्हणून त्यांच्या दिमतीला तीन 'बेड' बोटी व तीन ' टारपेडो' बोटी दिल्या होत्या. व अनेक मोठी लढाऊ जहाजे दूर असून या सर्वांच्या मधून आमची आगबोट चालली होती. असो आमचा प्रवास सुखाचा झाला व सर्वांची प्रकृतिहि उत्तम आहे. सुमारे एक आठवड्याने लंडनला पोहचू. (२) लॅन्सबरी यांचे टिळकाना पत्र लंडन १ नोव्हेंबर १९१८ अखेर तुम्ही इंग्लंडात येऊन पोहोचला. मी स्वतः आणि आमच्या हेराल्ड ऑफिसातील इतर सर्व मंडळी यांचा तुम्हाला नमस्कार. तुमच्या कामात तुम्हाला यश येवो अशी आमची प्रार्थना आहे. तुमची व माझी लवकरच गाठ पडेल व निदान खासगी रीतीने तरी तुम्ही आम्हाला तिकडची सर्व माहिती सांगू शकाल अशी आशा आहे. तसेच जाहीर रीतीने भाषण न करण्याचे जे बंधन तुमच्या- वर आहे ते बंधन लवकरच निघून जाईल अशी मला आशा वाटते. (३) टिळकांचे लॉईड जॉर्ज याना पत्र लंडन १३ नोव्हेंबर १९१८ इंडियन नॅशनल काँग्रेसच्यातर्फे अखिल हिंदी जनतेच्या करिता इंडियन होमरूल लीगकरिता व मी व्यक्तिशः स्वतः करता इंग्लंड व दोस्त राष्ट्रे यानी मिळ- विलेल्या यशाचे अभिनंदन करतो. मला अशी आशा व उमेद आहे की तुमच्या उदार व चतुर नेतृत्वाखाली तह होऊन सर्व राष्ट्राना शांतता प्रगति व बंधुभाव ही यापुढे लाभतील. बादशहा व महाराणी यानाहि आमचा हा राज- निष्ठापूर्वक संदेश आपण कळवावा.