पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० लो० टिळकांचे चरित्र भाग ५ चिरोलकेसकरिता म्हणून ते मला पासपोर्ट देतील. माझ्या खटल्याकरिता ही अट मी मान्य करीन पण तीहि तक्रार करून विलायतेत गेल्यावर ही अट काढून टाकण्याबद्दल वॉर - कॅबिनेट कडे अर्ज करण्याला मला हरकत का असावी ? अशी अट मी कबूल करून गेलो तर प्रतिवादीचा वकील म्हणेल ' टिळक हे अनिष्ट चळवळ करणारे आहेत म्हणूनच त्याना असे बंधन घातले. ' पण मी तक्रारीस मान्यता दिल्यावर त्याना असे म्हणता येणार नाही. ऑक्टोबरच्या पूर्वी केस निघेल अशी ठेवू नका. वरील धोरणाप्रमाणे वॉरकॅबिनेटकडे तुम्ही खटपट करून पहा. " सॉलिसिटरनीही खटपट केली पण व्यर्थ ठरली. टिळक विलायतेस पोचल्या- वर काही दिवसानी म्हणजे ता. ११ नोव्हेंबर रोजी टिळकांचे सॉलिसिटर यानी अंडर स्टेटसेक्रेटरी याजकडे अर्ज करून विनंती केली " टिळक व करंदीकर हे आपल्या कामाकरिता पासपोर्टच्या काही शर्ती मान्य करण्यास तयार झाले पण आता त्या ढिल्या कराव्या. इतरांच्या बाबतीत अशी गोष्ट सरकाराने केलेली आहे. डॉ. नायर अॅन्टीहोमरूलर ब्राह्मणेतर हे प्रथम अशाच शर्ती कबूल करून पासपोर्ट घेऊन विलायतेस आले. पण नंतर त्यानी अर्ज केल्यावर त्यांच्यावरील बंधने काढ- ण्यात आली.” पूर्वी नक्की याच मुद्यावर पार्लमेटमध्ये प्रश्न विचारण्यात आला तेव्हा असे उत्तर देण्यात आले होते की "डॉ. नायर यांच्याप्रमाणे टिळक विलायतेत आल्यावर त्यानाहि अशा प्रकारचे अपील करण्यास संधि देण्यात येईल." डॉ. नायर हे होमरूलला विरोध करणारे व टिळक होमरूलचे समर्थन करणारे, तेव्हा सर- कारने दोघानाहि सारखेच वागविणे योग्य होते. अदमासाप्रमाणे या अर्जाचा लवकरच निकाल लागला व टिळकावरची बंदी उठविण्यात आली. (४) निवडक कागदपत्र विलायतेला टिळक गेले ते चिरोल प्रकरण व सुधारणासंबंधी राजकीय चळवळ या दोन कामाकरिता गेले. पैकी पहिल्या कामाची म्हणजे चिरोल प्रकर- णाची सविस्तर हकीकत आम्ही मागील भागात दिलीच आहे. आता दुसऱ्या कामा- संबंधाची हकीकत सांगावयाची. पण ती आमच्या शब्दानी न सांगता पत्रव्यव- हाराच्या अस्सल कागदपत्रांकडूनच ती सर्व वदविण्याचा आमचा विचार आहे. या कागदपत्रांत अनेक प्रकार आहेत. १ होमरूल लीगच्या कामासंबंधाने पुण्यास होमरूल कचेरीकडे वेळोवेळी आलेले अहवाल. २ टिळकानी पुण्यास धोंडोपंत विध्वंस याना पाठविलेली घरगुती पत्ते ३ टिळकानी व्यक्तिशः इतर लोकाना पाठविलेली कामकाजाची पत्रे. ४ टिळकाना इतर लोकानी पाठविलेली या कालावधीतली पत्रे किंवा पत्नोत्तरे. ५ केसरीकडे आलेली बातमीपत्रे. या सर्व कागदपत्रापैकी निवडक व त्रोटक असे भाग घेऊन ते कालानुक्रमाने खाली दिले आहेत. त्यामुळे या बारा तेरा महिन्यातल्या टिळकांच्या हालचालींचे विचारांचे व कार्याचे चित्र वाचकांच्या डोळ्यापुढे जसे उभे राहील तसे आमच्या