पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ भाषणबंदी उठली झाला. वरील सर्व आगवोटीना चित्रविचित्र तऱ्हेचे रंग दिलेले होते. शिवाय सर्वच बोटी जवळ जवळ अर्ध्या गतीने चालत होत्या व पुढे चाललेल्या टॉपेंडो नागमोडी गतीने चालत. त्याशिवाय रात्रीच्या वेळी दिवा लागत नसे. त्याकरिता जेवणाचा तास बदललेला. सगळ्या विडी ओढणाराना सक्त ताकीद होती की रात्रीची विडी ओढावयाची झाल्यास आपआपल्या केबिनमध्ये जाऊन ओढा- वयाची. जसा ह्या सर्व वरच्या गोष्टीत पालट पडला तसा वोटीवर ठेवलेल्या पहा- यात फरक पडला. उतारू लोकातहि माणसे बोलावून त्यांच्यापैकी मागेपुढे पहारा ठेवला. उतारू लोकांच्या वर्तनातहि तसाच फेर पडला. सर्वांच्या तोंडावर काळ- जीची छटा दिसू लागली. जो तो आपला लाईफ बेल्ट आपल्याबरोबर बाळगू लागला व जरा खुट्ट झाले की लगेच दचकू लागला. तारातून आम्ही अमुक ठिकाणी आहो किंवा अमुक दिवशी अमुक मुक्कामाला पोचू अशा प्रकारची बातमीहि द्यावयाची नसे. उतारू लोकापैकी पुष्कळाना लढाईच्या बातम्या कळत. परंतु आम्हाला मात्र जेवढ्या बोडीवर लागतील तेवढ्याच समजत. या वेळेस आम्ही जिब्राल्टरच्या बाजूने गेल्यामुळे आमचा मुक्काम जिब्राल्टरशिवाय कोठेहि झाला नाही. जिब्राल्टरला कोणालाच उतरू दिले नाही व तेथेहि फारसा मुक्काम झाला नाही. आता आम्ही खऱ्या वॉरझोनमध्ये शिरत होतो. तेव्हा तोफांची सरबत्ती कधी कधी कानावर पडत असे. इंग्लिश चानलमध्ये तर बोट जणु काय जीव टाकीत चालली आहे अशाप्रमाणे पळत होती. शेवटी टिलवरी डॉक्समध्ये जाऊन पोचलो. तेथे गेल्यावर थॉमस कुकच्या एका एजंटाकडून पत्र पोचले. त्यात आमच्याकरिता स्वतंत्र घराची व्यवस्था केली असल्याबद्दल उल्लेख असून त्यात पत्ता दिला होता. बोटीतून चालचलाऊ सामान घेऊन उतरलो होतो. तेथून थोडासा रेलगाडीने प्रवास करून फेनचर्च स्टेशनवर येऊन पोचलो. वाटेने गाडीचे सगळे पडदे खाली ओढून घेणे भाग पडले होते व सुमारे पाचच्या सुमारालाच काळोख झाला. वोटीत आमचा विचार चालला होता की उतरण्याची व्यवस्था काय करावयाची ? ती अनायासेच पत्रामुळे जागा नक्की झाल्याने जितका आम्हास आनंद झाला त्यापेक्षा शतपट जास्त आम्ही घरी जाऊन पोचल्यावर झाला. घरी दादा उतर- ताच बॅपटिस्टासाहेबानी खरोखरी त्यांच्या गळ्याला मिठीच घातली. " (३) भाषणबंदी उठली टिळकाना सरकारने पासपोर्ट दिला तो प्रथम फक्त चिरोल केसकरिता. ता. १८ जून १९१८ रोजी टिळकानी खालीलप्रमाणे आपल्या सॉलिसिटरना पत्र लिहिले:- “४५०० पौंडांची हुंडी कोलंबोडून ता. ४ एप्रिल रोजी पाठविली ती पोचली की नाही ते कळवा. मुंबईसरकाराने मला असे कळविले आहे की विला- यतेत मी कोणत्याहि राजकीय चळवळीत न पडण्याचे वचन देईन तर केवळ