पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ लो० टिळकांचे चरित्र भाग १ या गुरुनिष्ठेचे फळहि त्याना तसेच मिळाले. कारण 'आपणासारिखे करिती तात्काळ' ही म्हण या ठिकाणी खरी ठरली. गोखले यांचा बी. ए.च्या परिक्षेचा विषय गणित असला तरी इंग्रजी भाषेच्या आवडीने त्यानी तिचा परिश्रमाने अभ्यास करून ती चांगली हस्तगत केली. स्मरणशक्ति खूप कमावलेली असल्याने त्यांचे इंग्रजी भाषेचे पाठांतर फार चांगले होते. पण पुढे हळू हळू इंग्रजी हा शिक्षणाचा विषय सोडून देऊन त्यानी इतिहास व अर्थशास्त्र घेतले आणि शिक्षकाचे काम सोडून देईपर्यंत त्यानी त्या विषयातील आपली प्रवीणता जशी वाढवली त्याप्रमाणे आपल्या उत्कृष्ट व्याख्यानानी शिष्यांचेहि कल्याण केले. हे दोन विषय त्याना सार्वजनिक आयुष्याच्या प्रवेशद्वारासारखे उपयोगी पडले. १८८७ पासून रानड्यांनी त्यांचा सार्वजनिक सभेत प्रवेश करविला. आणि सीतारामपंत चिपळूणकरानंतर ते सभेचे चिटणीस व त्रैमासिकाचे संपादक झाले. या सुमारास आगरकराबरोवर त्यानी 'सुधारक' पत्र काढले पण पुढे लवकरच त्यानी त्याचा संबंध सोडला. टिळक त्यांहून नऊ वर्षांनी वडील तथापि दोघांचेहि सार्वजनिक चरित्र बरोबरच सुरू झाले व प्रथम बरीच कामे उभयतानी भागीदारीने केली. एका बाजूने टिळक हे चिट- णीस निवडून द्यावे तर दुसऱ्या बाजूने गोखले. पण थोड्याच दिवसानी त्यांची जोडी फुटली आणि दोघानीहि दोन मार्ग आक्रमिले, सन १८९२ किंवा १८९३ साली मुंबईस एका समेत लष्करी खर्चाच्या विषयावर गावल्यांचे मुख्य वक्ते म्हणून भाषण झाले. अध्यक्ष मेथा व उपवक्ते वाच्छा हे होते. पण आपल्या वक्तृत्वाने व विषयप्रतिपादनाच्या शैलीने गोखल्यानी दोघांवरहि ताण केली आणि हे पाहून मेथा व वाच्छा या दोघांच्याहि चेहेऱ्यावर गोखल्यांविषयींच्या कौतुकाचे तेज चमकत होते हे सर्वांनी पाहिले. यावेळी गोखले अवघे सव्वीस किंवा सत्तावीस वर्षांचे असावे. सार्वजनिक कामांत त्यांचे पाऊल जे एकदा पुढे पडले ते कधीच मागे आले नाही. १८९६ साली हिंदुस्थानतर्फे स्त्री कमिशनपुढे त्याना साक्षीदार म्हणून पाठविण्यात आले आणि तेथे झालेली त्यांची प्रश्नोत्तरे पाहिली म्हणजे कोणालाहि त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल अभिमान वाटेल. - १८९९ साली ते मुंबईफायदे कौन्सिलात शिरले पण ते क्षेत्र त्यांच्या कर्तृत्वाला अपुरे असे तेव्हाच दिसून आले. १९०२-०३ साली सर फेरोजशहा मेथा यानी वरिष्ठ कौन्सिलातील आपली जागा खाली करून त्याना दिली. तेथपासून सतत अकरा बारा वर्षे ते तेथे होते पण त्यांची जागा घ्यावी असे दुसऱ्या कोणाला वाटेना ब द्यावी असे कोणास म्हणवेना. कौन्सिलातील त्यांची भाषणे वाचली म्हणजे ती माहितीने पूर्ण भरलेली व अत्यंत परिणामकारक अशी सहज दिसतात. शिवाय त्यांची वाणी मृदु मोहक असल्यामुळे आणि त्यांच्या बोलण्यात सच्चेपणा व कळकळ ही मूर्तिमंत प्रगट होत असल्याने त्यांची छाप तज्ज्ञ व निष्णात अशा अनुभविक हुशार अधिकाऱ्यांवरहि पडे. त्यांच्या भाषणात मुख्य गुण म्हटले म्हणजे भाषण लहान असो मोठे असा त्यात प्रमेय व अनुमान हीं एखाद्या सुंदर इमारतीप्रमाणे