पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ५ वाचावयाचे राहिले होते. तेव्हा त्याची वाटाघाट करण्याकरिता पुस्तके बाहर काढून ठेविली. असो. या वेळेस मला लघुलेखन येत असते तर बरे झाले असते असे वाटू लागले. कारण पुष्कळसे संवाद टिपून ठेवण्यासारखे असत. एडन सोडल्यावर आमच्या धोतर नेसण्यासंबंधी पॅसेंजर लोकात कुरकुर सुरू झाली. दादाना पायाला संवय व्हावी म्हणून हळूहळू बूट घालण्यास सुरुवात करण्याचे ठरविले होते. तसेच त्यांचे कपडेहि नीट काढून साफ करून ठेविले होते. अशा वेळी त्या बोटीवरील चीफ एंजीनिअर मला विचारू लागले की ' टायलक साहेब नही है ?' मी साहेबाना सांगितले की त्यांच्याजवळ इतके कपडे आहेत की कदाचित् तू तितके पाहिले नसतील. एडन सोडल्यापासून हळूहळू म्हणजे दिवसाचे निदान दोनतीन तास तरी पाटलोणी घालू लागलो. " पोर्टदला गेलो. येथेहि आम्हाला उतरू दिले नाहीच. येथे आमचा मुक्काम तीनचार दिवस होता. असो. ह्या सुमाराला चिरोल - खटल्यातील पुस्तके पाहावयाची मला इच्छा झाली व त्यांत दादानी आपली स्वतःची संगतवार लिहिलेली त्रोटक हकीकत पाहावयास मिळाली. तसेच सावरकरबंधू यांच्या खटल्यासंबंधीहि काही कागद वाचावयास मिळाले. त्या वेळेस ते शिक्षेच्या अमानुष प्रकारासंबंधी जवळ जवळ आपणाशीच बोलू लागले ! "केवळ राष्ट्राचे कल्याण व्हावे ह्या हेतूने प्रयत्न करीत असता जन्मठेपीची शिक्षा देण्यापेक्षा अशा माणसाला एकदम ठार मारून टाकला तर बरा. तुरुंगात आपले आयुष्य कंठीत असताना बिचाऱ्याला किती मानसिक यातना सोसाव्या लागत असतात. " " पोर्टदला तीनचार दिवस मुक्काम का होता व निघणार केव्हा हे आम्हाला कळलेच नाही. निघण्यापूर्वी बोटीवर एके दिवशी सकाळी नोटीस लागली की अमक्या अमक्यानी अमुक लाईफ बोटीशी आपल्या गळ्यात लाईफ बेल्ट अडकवून दुपारी चार वाजता हजर राहावे. व यदाकदाचित् जर बोटीला काही वाटेत दगाफटका झाला तर धोक्याची सूचना देताच सर्वानी आपआपल्या नेमलेल्या जागी हजर राहावे. या वेळी दादांची व माझी ताटातूट होत अस- त्याने आम्हा दोघाना एकाच होडीत ठेवा असा कॅप्टनसाहेबाकडे अर्ज केला. परंतु एकदा लिहिलेले ते ब्रह्मवाक्य अशीच व्यवस्था असल्याने आमच्या अर्जाचा काहीच परिणाम झाला नाही. शेवटी दुपारी रंगीत तालीम झाली. त्या वेळेला उभ्या दोराच्या शिडीवरून दादाना तो गळ्यात पट्टा बांधलेला अशा वेळी एखाद्या तरुणासारखे भराभर उतरता - चढताना पाहून आम्हास तर अचंबाच वाटला. व या वेळेस कॅमेरा असता तर हिंदुस्थानातल्या लोकाना दादांचा फोटो खास दाखविता आला असता. " आता आमचा सरंजाम वाढला. आमच्या मागेपुढे दोन पाणबुड्या एका बाजूला मॅन आफ चॉर. त्याच्यावर टेहळणी करण्याकरिता एक बलून. शिवाय चार-पांच विमाने, आणखी एक-दोन आगबोटी. अशा रीतीने आमचा सरंजाम