पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ ८८ प्रवास 9 राहत होतो त्यामुळे थोडासा मनाला संकोच वाटत असे. आम्ही आपला देशी पेहरावच कायम ठेवला होता त्यामुळे, व शिवाय आपण होऊन कोणाजवळ बोलावयास जावयाचे नाही असे जवळ जवळ ठरल्यामुळे, आमच्याशी कोणी बोलावयास येत नसत. दादांची दिनचर्या कशी असे खात काय पीत काय वगैरे सर्व गोष्टी अवश्य सांगितल्या पाहिजेत. झोप जरी थोडी येत असली तरी अंथरु णावर स्वस्थ पडून विचार करीत राहावयाचे व अशातच रात्रीचे बारा तास घालवावयाचे. सकाळी चहा व एखाद दुसरे बिस्कीट. सरासरी १० वाजता जेवण म्हणजे गोविंदजी वसनजीनी मुद्दाम करून दिलेल्या मालापैकी कधी पुन्या कधी खाज्या कधी तारफेणी व दूध दही भाजी वगैरे पदार्थ व शिवाय लोणची. पाकसिद्धी आम्हीच करीत होतो. सामान मात्र बोटीवरून घेत असू. जरी आमच्या खाण्यात फळे जास्त असावी अशी अट आम्ही तिकिटे घेताना घातली होती तरी तो मिळण्यास थोडीफार अडचण पडली. परंतु द्रव्याच्या किल्लीने हात सढळ करीत असू. दादा कोणत्या कामाकरिता जात होते हे सर्व साहेब लोकाना माहीत होते. त्यामुळे कधीकाळी एखाददुसरा साहेब चार शब्द बोलत असे. त्यात हिंदू-मुसलमानांचे वितुष्ट अठरा पगड जाति असल्याच गोष्टींचा समावेश असे. 'प्रथम काही दिवस आम्हाला एक बंगालीबाबू म्हणजे करमणुकीचा विषय होऊन बसला होता. बाबूमहाशय शिक्षणाकरिता विलायतेला निघाले होते. अर्थातच पहिले दिवशी त्यानी आपले मन विशेष खवळू दिले नाही. परंतु दुसरे दिवशी दोनचार वेळ जीव देण्यास निघाले. एडनवरून परत जातो म्हणून म्हणू लागले. डोके आपटीत रडत. अशा तऱ्हेने काही वेळ करमणूक म्हणून जरी वाटत होती तरी पुढे पुढे त्याचा त्रास होऊ लागला. दादानी त्याना उपदेश करून पाहिला. परंतु काही उपयोग नाही. शेवटी त्याना सर्वांनी स्पष्ट बजावले की आता जर गप्प राहिला नाहीत तर कॅप्टनकडे तक्रार करून कोंडून ठेवण्याचा प्रसंग येईल. तेव्हा जरा प्राणी शांत झाले. असो. अशा रीतीने पहिले तीनचार दिवस गेले. जसजसे एडन जवळ येत चालले तसतसे घरी पत्र लिहून आम्ही येथपर्यंत खुशाल आलो हे कळविण्यात व दुसऱ्या अनेक लहान मोठ्या गोष्टी कळविण्या- करिता लिहिण्यातच आमचा वेळ गेला. बंदरावर बोटीच्या डॉक्टरची तपासणी होते व त्या वेळी कारंटाईन वगैरेसंबंधी हुकूम सुटतात. या वेळेला आजार वगैरे काही नव्हता. परंतु इंडियन पॅसेंजर्सना फक्त उतरण्याची मनाई झाली व बाकीची सर्व मंडळी उतरली. अर्थातच सर्वाना वाईट वाटले. परंतु उपाय काय ? ह्यात काही तरी गुप्त हेतु होताच. त्याशिवाय दादाना एडनला उतरण्याला बंदी करण्याचे कारण काय ? असो. येथे काँग्रेसच्या अध्यक्षाचा मान दादाना मिळाल्याची तार मिळाली. आम्ही सुखरूप पोचल्याबद्दल आम्हीहि पुण्याला तार केली व इतर गप्पा मारण्यात वेळ घालविला. थोडेसे खाण्याचे पदार्थ घेतले व लगेच पुढील कार्यक्रम ठरविला. चिरोल - केसचे कागद काही