पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ५ इतक्या गोंधळून टाकण्यासारख्या आहेत की तेथे टिळकापेक्षाहि चाणाक्ष मनुष्य प्रथम गोंधळूनच जावयाचा. अंग कमकुवत झालेले पाय लटपटणारे अशी स्थिति असल्यामुळे कोणीतरी बरोबर घेतल्याशिवाय ते कधीहि बाहेरच पडत नसत. यामुळे टिळकांचा अंदाज कोठे चुकला तर तो सुधारून घेण्यास जोडीदार असे. बारा चौदा महिने लंडनमध्ये राहून ते शहर इतके थोडे पाहिलेला मनुष्य टिळकाप्रमाणे दुसरा क्वचितच मिळेल. कामाशिवाय टिळक सहसा बाहेर पडत नसत व काम होताच घरी परत येत. सहज खेप टाकावयाची तर ती हेरल्ड पत्राच्या कचेरीकडे म्हणजे लॅन्सबरीना किंवा वृद्ध सोशियालिस्ट हाइडमन याना भेटण्याकरिता. इंडिया ऑफीसच्या लायब्ररीत ते एक दोन वेळ गेले होते करण तेथे संशोधक विद्वान गृहस्थ थॉमस हा लायब्ररिअन असे. ' ग्रामं गच्छन् तृणं स्पृशति' या नात्याने सभाना किंवा आगाऊ मुलाखती ठरलेल्या गृहस्थांच्या भेटीला जाताना त्यानी जे लंडन पाहिले असेल तेवढेच ! निवृत्तिपर मनाला शरी- राच्या दुर्बलतेची जोड मिळाल्यामुळे अमुक एक गोष्ट म्हणून आपण पहावयास जाऊ अशी उत्सुकता त्याना केव्हाच वाटली नाही. लौकिक मनुष्याच्या दृष्टीने टिळकांची बिलायतची खेप बहुधा फुकटच गेली. पण टिळक 'विलायते 'ला गेलेच नव्हते. ते काही एक अवश्य कर्तव्य करण्याला गेले होते ! ( २ ) प्रवास टिळकाना दुसऱ्या खेपेस पासपोर्ट मिळून ते विलायतेस निघाले त्या प्रसं गाचे प्रवासवर्णन टिळकांचे परिचारक व सोबती गणपतराव नामजोशी यानी टिळकांच्या आठवणीच्या दुसऱ्या खंडात दिले आहे तेच येथे देतो. याहून अधिक विश्वसनीय व सविस्तर वर्णन उपलब्ध नाही. नामजोशी लिहितात:- "यापुढे सप्टेंबरमध्ये पासपोर्ट पुनः मिळाले व विलायतेस जावयाचे ठरले. याच सुमारास मुंबई पुण्यास इन्फ्ल्युएन्झा सुरू होता. ज्या दिवशी निघावयाचे त्या दिवशी आम्हा सर्वाना एकच काळजी वाटत होती ती ही की आम्ही बोटी- वर धडपणी चढतो कसे व चढण्यापूर्वी आणखी कोणकोण आजारी पडेल. असो. शेवटी बोटीवर पाऊल तर टाकले. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंताच दिसत होती. कारण दादा थकलेले. त्यांतून पाणबुड्यांचा मारा संपला नव्हता. शिवाय जशी पुण्यात तशीच सर्व युरोपभर इन्फ्ल्युएन्झाची साथ सुरू होतीच. बोटीवरची जागा आम्ही नक्की करून ठेविली होती व ती जागा चांगली मोक्यावरची गांठली होती. आम्ही बोटीवर चढलो तो सामानसुमानाचे मागे लागलो होतो. इतक्यात आमच्या केबिनमध्ये आपले एक सोटभैरव घुसलेले आढळले. अर्थातच तक्रार करून त्याना हुसकून देणे भाग पडले. यानंतर सामानाची व्यवस्था करण्यात व लांबून मुंबईची शोभा पाहण्यात आमचा सर्व वेळ गेला. एकदाचे मागीला लागलो म्हणून सर्वानाच आनंद झाला. दादा व मी असे दोघे एका केबिनमध्ये