पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ प्रास्ताविक ५ कपडाच हवा. दक्षिणी पगडी व साहेबी टोपी यात अधिक कुरूप कोणते हा प्रश्नच आहे. पण "तुमची गाडी टोपी जशी तुम्हाला वाईट वाटत नाही तशीच आमची पगडी आम्हाला " अशा आत्मविश्वासाने मान ताठ करून मनुष्य चालला तर लंडनच्या रस्त्यातहि त्याला कोणी सहसा हसणार नाही. नेकटाय वगैरे बाबीना टिळकानी सर्वस्वी फाटा दिलेला होता. हवामान लक्षात घेता बूट पाटलोण या गोष्टी केवळ सोयीच्या म्हणता येतील, पण नेकटाय ही मात्र अनुकरणाच्या दास्यत्वाची पक्की खूण आहे. खुद्द विलायतेतहि नेकटाय न चालणारे असे धर्मो- पदेशक वगैरे लोक असतात. त्यांचे पाहून नेकटाय न घालणारे टिळक हेही एक प्रीस्ट किंवा धर्मोपदेशक आहेत असे प्रेक्षक मानीत व हसत नसत. घरच्या वागणुकीत टेबलावर जेवणे ही एक गोष्ट वगळली असता टिळ- कांच्या इकडच्या व तिकडच्या वागणुकीत काहीच फरक नव्हता. जेवताना ते जिंजर किंवा सोडा वॉटर घेत. पण हे पदार्थ ते इकडे हिंदुस्थानातहि केव्हा केव्हा घेत असल्यामुळे या बाबतीत फरक असा काहीच नव्हता. इंग्लंडात बारा चौदा महिन्यात टिळकानी काय काय काम केले हे पुढे दिसून येईलच. तूर्त मुद्दा वागणुकीसंबंधाचा आहे. इकडेहि गव्हर्नरपर्यंत लहान थोर दर्जाच्या युरोपिअन लोकाशी भेटण्याबोलण्याचा टिळकाना परिपाठ असल्यामुळे तिकडे इंग्रज लोकाशी वागताना टिळकांचे कोठेच अडले नाही. दिवाणखान्यात शिरताना आधी कोणी शिरावे मागून कोणी जावे, बाहेर पडताना आधी मागे कोण, असल्या सूक्ष्म रीतिरिवाजाकडे टिळकानी जसे इकडे केव्हाही लक्ष दिले नाही तसेच तिकडेहि भेटणे बोलणे अर्थात् कामापुरते व कामहि ठराविक म्हणजे राजकीय विषयाचा वादविवाद करणे हे असल्यामुळे, आणि टिळकांचे बोलणे मुद्देसूद व कुशाग्रबुद्धि दिसून येणारे असल्यामुळे, परक्या मनुष्यावर त्यांची छाप तेव्हाच हटकून पडे व बुद्धीची छाप मनावर पडल्यानंतर किरकोळ गोष्टीकडे लक्ष देण्याला सभ्य मनुष्याला अवसरच मिळत नाही. शिवाय कारणाखेरीज या बारा चवदा महिन्यात ते कोणाकडे गेले आले नाहीत. कोरड्या शिष्टपणाच्या संभाषणात उगाच बोलून हवेत सोडण्यासारख्या पुष्कळ गोष्टी असतात. पण या दृष्टीने टिळ कांचे विलायतेत एकाहि इंग्रजाशी भाषण झाले असेल असे वाटत नाही. टिळ काना उपहाराची व जेवणाची क्वचित् आमंत्रणे येत व या प्रसंगी इतर लोक जेवीत असता टिळकाना स्वतः एखाददुसरे फळ तोंडात उचलून टाकण्या- खेरीज दुसरा उद्योग नसल्यामुळे रिकाम्या गप्पागोष्टी बोलण्याला जो वेळ होई त्याचा मात्र या कामी उपयोग होत असे. टिळकाना दूरचे न्याहळत नसे हे प्रसिद्ध आहे. पण इकडच्याप्रमाणे तिकडेहि या शारीरिक अदूर दृष्टीची बाग त्यानी चाणाक्षपणाने भरून काढली होती. लंडनच्या नकाशाचा व लंडन गाईडचा त्यानी एकप्रकारे अभ्यासच केला होता. यामुळे एकाद्या नवीन ठिकाणच्या पत्त्या- संबंधाने ते एखाद्या माहितगारासारखे वागत. पण लंडनचे रस्ते आगगाड्या वगैरे