पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ डील शिष्टाचारास अनुसरून राहिले व ज्या गोष्टी देशी रिवाजाच्या त्या तशाच तिकडेही त्याना राखाव्या लागल्या. त्या लोकाना पटतील असाच त्यांचा आत्म- विश्वास असे. सभ्यता ही केव्हाही व कोठेही झाले तरी शिष्टाचाराचा आत्मा आहे व देशादेशाच्या रितीभाती कितीही भिन्न भिन्न असल्या तरी सभ्यता म्हणून म्हणतात ती कोणच्याहि देशात एकाच स्वरूपात आढळते. नम्रता आदरबुद्धि लीनपणा सहिष्णुत्वमनाचा मोठेपणा काही मर्यादेपर्यंत वाईटहि चांगल्याच बुद्धीने झालेले आहे असे मानण्याची तयारी व साधारणतः शारीरिक स्वच्छतेविषयी अगत्य इतक्या सर्व गोष्टी मिळून सभ्यता बनते असे म्हणण्यास हरकत नाही. आणि या दृष्टीने इंग्लंड-फ्रान्सपासून तो चीन-जपानपर्यंत कोणच्याही देशात तुम्ही जा. तुम्हाला खरी सभ्यता व शिष्टाचार फारसे वेगवेगळ्या स्वरूपात दिसणार नाहीत. विदेशी मनुष्यांचा संबंध आला असता आत्मविश्वासाचे तत्त्वहि बरेच महत्त्वाचे ठरते. कारण एकाकरिता दुसरा आपला रीतिरिवाज किंवा पोषाख वद- लीत नाही. तरी पण आपला स्वतःचा पोषाख चांगला आहे त्याला नाव ठेवण्यासारखे काही नाही असा आत्मविश्वास मनुष्याच्या ठिकाणी असला तरच तो दुसन्याशी वागताना शरमिंधा होत नाही. आणि "माझे ते निदान माझ्यापुरते तरी बरोबर आहे" अशी स्थिर बुद्धि ज्याच्या मनात असते तोच मिथ्यानुकरणा- पासून अलिप्त राहतो. दुसऱ्याचे अनुकरण करण्यास जाऊन जो फसला त्याच्या- सारखी फजिती मात्र दुसऱ्या कोणाची नाही. टिळक विलायते स गेले त्यापूर्वी काही दिवस बॅपटिस्टा हे तेथे डेप्युटेशनच्या . कार्याकरिता गेले होते व त्यानी टिळकाकरिता घर भाड्याने घेऊन चालचलाऊ बिन्हाड सजवून ठेविले होते. त्यांचे पहिले वसतिस्थान स्वतंत्र असून त्यात सर्व सोयी होत्या. पण हिंदी मनुष्याला हिंदी रिवाजाने रहावयाचे असल्यास विला- यतेतहि फारशा सोयी लागत नाहीत. साध्या राहणींचा फायदा मनुष्याला जग- भर मिळतो. हिंदुस्थानातल्याप्रमाणे लंडनमध्येही टिळक दोन वेळ चहा व दोन वेळ जेवण याशिवाय काहीही खात नसत. टिळकांच्या पोषाखाच्या दृष्टीने बूट व पाट- लोण व लांब कोट एवढाच फरक विलायतेत पडला होता. उपरण्यास रजा मिळाली होती. पण शिरोभूषण पगडी ही मात्र डोक्यावर राहिली. बूट पाटलोण हे विलायतेत अपरिहार्यच आहेत. कोणच्याहि देशाचा पोषाख पुष्कळसा तेथील हवामानावरूनच बनलेला असतो. इंग्लंडात लोकरीचे स्टॉकिंग्ज व बूट न घालता ऐन उन्हाळ्यात भर दोन प्रहरी घरात काही वेळ बसता येईल, नाही असे नाही. पण मोकळ्या पायाने किंवा जोडा घालून उन्हाळ्यातहि सर्व दिवसभर वावरता येणार नाही. तीच गोष्ट पाटलोणीची. पाय चांगले लपेटणारे असे लांबलचक धोतर नेसून उन्हाळ्यात लंड- नच्या रस्त्यातून फिरता येईल. पण तेथील हवा इतकी चंचल आहे की केव्हा गारठा पडेल याचा नेम नाही. व गारठ्याच्या हवेला विजार पाटलोणीसारखा बंदिस्त