पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ प्रास्ताविक निभावून गेली. ट्रॅम ऑम्निबसचे अड्डे व ट्यूब गाड्यांची स्टेशने किंचित लांब लांब असतात यामुळे जरूर तेथे टॅक्सि करीत. पण टॅक्सीला खर्च फार यामुळे चार पावले अधिक चालूनहि जात. कोणालाहि भेटावयाला टिळक गेले तरी प्रायः नामजोशी हे बरोबर रहात. टिळक तेरा महिने विलायतेत होते तरी आपल्या कामाशिवाय ते कोठेह बाहेर गेले नाहीत. इमारती बागबगीचे चित्रसंग्रह प्राणिसंग्रह इत्यादि वस्तु किंवा इतिहासप्रसिद्ध स्थळे ही त्यानी मुद्दाम जाऊन कधीच पाहिली नाहीत. मग सिनेमा नाटकगृहे यांची गोष्टच बोलावयास नको ! नाही म्हणावयाला डॉ० क्लार्क यांच्या निमंत्रणावरून ते तिकडची एक जत्रा पाहावयास गेले होते. मधून मधून ते पार्लमेंटच्या सभागृहाकडे जात. पण तेथेहि वादविवाद ऐकण्याला ते फारसे गेले नाहीत. रॉयल एशियाटिक सोसायटीत मात्र ते केव्हा केव्हा जात. तात्पर्य मुशा- फर प्रवाशी यांच्या पद्धतीप्रमाणे त्यानी विलायत मुळीच 'पाहिली' नाही. लंडन सोडून बाहेर पांच चार शहराखेरीज कोठे गेले नाहीत व तेथे गेले तेहि व्याख्याना- पुरते गेले. इंग्लंड सोडून बाहेर युरोपात अमेरिकेत जावे अशी त्यानाहि मनातून इच्छा होती. पण त्या दिवसांत पासपोर्ट मिळण्याची पंचाईत. शिवाय शरीर दुर्ब- लता कानाला कमी ऐकू येणे या सर्व कारणाकरिता काम संपल्याबरोबर मिळाली ती आगबोट घेऊन टिळक हिंदुस्थानाला परत आले. व आगबोटहि जाता येता थेट विलायतची मिळाली यामुळे फ्रान्स वाटेवर तरी तेथेहि त्याना उतरता आले नाही. लो. टिळकांचा इकडील वर्तनक्रम सर्व लोकांना परिचितच होता. कारण बाहेर कोठेहि चारचौघात मिसळून सर्वस्वी त्यांच्यापैकी एक असल्याप्रमाणेच ते बागत. प्रत्यक्ष त्यांच्या खाजगी घरीही ते असतील तेथपर्यंत सर्व तऱ्हेच्या लोकांचा सर्व काल प्रवेश असे. म्हणून त्याना प्रेक्षकापासून खाजगी असे काहीच राखून ठेविता येत नसे व तसे ठेवण्याची त्यांची फारशी इच्छाहि नसे. परंतु सुमारे चौदा महिने ते हिंदुस्थानाबाहेर म्हणजे विलायतेत होते त्यावेळचा त्यांचा वर्तन- क्रम कसा असेल याविषयी लोकाना एक प्रकारचे कुतूहल वाटत असे. टिळक विलायतेस गेले त्यावेळी पुष्कळाना अशी शंका वाटत असे की टिळकांची राहणी पूर्णपणे देशी पद्धतीची असल्यामुळे त्यांचे तिकडे पदोपदी नडेल. ते लोकाना हंसतील ! लोक त्याना हसतील ! मिळून त्यांच्या सफरीचा सगळा गोंधळ उडेल. पण अनुभवांती हा अंदाज सर्वस्वी फसला. टिळकांची रहाणी देशी रिवाजाची असली तरी युरोपिअन लोकांच्या रहाणीची त्याना ऐकून व वाचून फार सूक्ष्म माहिती होती. यामुळे त्यानी तिकडील लोकाविषयी उप- हासबुद्धि दर्शविली नाही. तसेच आपण परक्या समाजात गेलो असता कसे वागावे ह्याचीहि त्याना पूर्ण जाणीव असल्याने त्यांचे इंग्लिश समाजातील वर्तन तिक- टि० उ...२५