पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो. टिळकांचे चरित्र भाग ५ काही लोकांची प्रकृती ते केवळ वनस्पत्याहारी असताहि उत्तम राहिली होती. दूध फळे पाव बिस्किटे लोणी साखर बटाटे व इतर भाज्या हे पदार्थ वाटेल तसे वाटतील तितके मिळतात. येऊन जाऊन तळलेले फोडणी दिलेले किंवा मसाले- दार पदार्थ मिळत नाहीत. तात्पर्य खाण्यापिण्याच्या बाबतीत टिळकाना व इत- राना काहीच अडचण पडली नाही. टिळकाबरोबर गेलेल्या लोकापेकी वनस्पत्याहारी लोकांचीहि प्रकृती विलायतेत सुधारून आली. दादासाहेब करंदीकर हे वृद्ध असताहि तेथे स्नानसंध्या वगैरे सर्व कार्य यथासांग करीत. निषिद्ध आहाराला ते दुरूनहि शिवले नाहीत. तथापि व्यायाम व विलायतची थंड हवा यांच्या योगाने इकडे परत आल्यावर त्यांच्या गौरवर्ण गालावर गुलाब फुललेले लोकानी पाहिलेच असतील. टॉलबट रोड- वरील ज्या घरात टिळक राहात होते त्याचे मालक शेट दीपचंद जव्हेरी हे सुरतचे रहिवासी व धर्माने जैन आहेत. ते जवाहिराचा व्यापार करण्याकरिता इंग्लंड व फ्रान्स या देशात पुष्कळ वर्षे जाऊन सहकुटुंब राहिलेले आहेत. ते पूर्णपणे शाकाहारी आहेत. त्यानी इकडून दोन आचारी तिकडे नेले होते. आणि त्यांच्या उपवनगृहात त्यानी आम्हाला दूधपाक साखरभातासुद्धा मेजवानी दिली. तात्पर्य विलायतेत इकडचा पदार्थ तयार करण्याची सर्व साधने मिळतात. जिन्नसहि चांगला तयार होतो. फक्त या विशेष सोईला खर्च येतो म्हणून विद्यार्थी वगैरे लोकाना तो झेपत नाही. टिळक विलायतेत गेले होते तरी त्यांच्या दिनचर्येत काही विशेष फरक पडला नव्हता. ते नित्याप्रमाणे सहा सात वाजता निजून उठत. सर्व प्रातर्विधि देशी पद्धतीप्रमाणे करीत. फक्त विलायतेस गेल्यापासून विजार पाटलोण त्याना जी एकदा चिकटली ती परत येईपर्यंत सुटली नाही. धोतर नेसून हिंडणे फिरणे शक्यच नव्हते. बूट घालण्याचा कंटाळा परंतु तोहि त्याना नेहमी घालावा लागे. छान- छोकीचा स्वभाव नसताहि दाढी वाढविली नसल्याने त्याना नित्य आपल्या हाताने श्रमश्रु करावी लागे. पण ते वस्तरा झाकलेलाच वापरीत. कारण उघड्या वस्तऱ्याने श्मश्रु आपल्या हाताने करण्याची त्याना सवय नव्हती. शिवाय मधुमे हाची व्यथा असल्याकारणाने यत्किंचितहि कापणे जखम होणे हे त्याना घातुक होते. सकाळचा चहा वगैरे झाल्यावर ते नियमाने पाच चार मुख्य मुख्य वर्तमान- पत्रे वाचीत व नंतर पत्रव्यवहार पहात. नामजोशी बरोबर होते त्याना टाईप- राइटिंग येत असल्यामुळे ते पत्रांच्या प्रति करीत. टिळकानी तिकडचा वेगळा सेक्रेटरी ठेवला नव्हता. रोज भेटी परतभेटी यांचा कार्यक्रम भरपूर असे. व तीच थोडी जिकीरीची गोष्ट होई. एकतर चालताना पाय किंचित लटपटत. शिवाय कानाला ऐकूहि थोडे कमी येई. विलायतेतील रहदारी बोलावयासच नको. ऑम्नेबस क्षणभरच उभी रहावयाची. तितक्यात चढउतार करावा लागे. तथापि नामजोशासारखे दक्ष व खंबीर परिचारक असल्याने ही सर्व हालचाल