पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ प्रास्ताविक भाग ५ वा. विलायतेतील हकीकत ( १ ) प्रास्ताविक टिळक ता. ३० आक्टोबर १९१८ रोजी विलायतेस पोचले व तेथून परत ता. ६ नवंबर १९१९ रोजी निघाले. अशा रीतीने ते विलायतेस सुमारे १३ महिने होते. यापैकी पहिले १० महिने ते मैदाव्हेल या भागात हौले प्लेस नं. १० च्या घरात रहात होते. शेवटी तीन महिने ते बेजवॉटरच्या मोहोल्यात टॉलबट रोड नं. ६० च्या घरात राहिले होते. पहिल्या बिन्हाडी होते तोपर्यंत त्यानी मॅक्नल्टी या नावाचे तीन माणसांचे एक कुटुंबच्या कुटुंब नोकरीस ठेवले होते. त्यापैकी मिस्टर मॅकल्टी हा बाहेर कामास जाई आणि त्यांची बायको व मुलगी ही टिळक व त्यांची मंडळी यांचे घरकाम व स्वयंपाक करीत. भात भाजी ही त्याना करता येतच असत. पण टिळकाना लागणाऱ्या पुऱ्या करण्यास त्याना शिकविण्यात आले होते. पाव बिस्किटे ही बाहेरचीच आणीत. पण पुडिंग वगैरे शाकाहारी पक्वान्ने बिलायती पद्धतीची त्या करीत. ते पदार्थ हिंदुस्थानात असता खाण्यात न येणारे असे होते पण शुद्ध स्वच्छ व रुचकर असत. टॉलबटरोडवर राहावयास गेल्यावर तेथे एक कर्नाटकी ब्राह्मण आयताच मिळाला. तो मूळ कुचविहारच्या राणी इंदिरा राजा यांच्या परिवारात विलायतेत गेला होता. त्याला याच सुमारास हिंदुस्थानात परत जाण्याला परवानगी मिळाली. त्यामुळे रिकाम्या आचान्याला नोकरी आणि गरजू गृहस्थाला रिकामा नोकर असा योग जुळून आला. हा जातिवंत आचारी नसल्यामुळे स्वयंपाकाचे काम बिघडे, भात आमटीहि फारच सुमार करी. पण विलायतेच्या वनवासात पक्वान्ने न मिळाली तरी नुसता दूध भात काय थोडा झाला ? स्वतः टिळकाना पुरीशिवाय दुसरे काही खाव- याचेच नव्हते. पण इतराना ज्याच्या त्याच्या रुचीप्रमाणे उभय आहाराचे अनेकविध पदार्थ मिळण्यासारखे असल्यामुळे उपवास पडण्याचे कारण नव्हते. विलायतेच्या अनुभवावरून असे वाटते की तिकडे मांसाहार हा सोईचा व प्रकृ- तीला अधिक मानवणारा असला तरी वनस्पत्याहारावर मनुष्य जगणारच नाही असे नाही. विद्यार्थीस्थितीत जे लोक तिकडे असतात व ज्याना घरगुती खाणा- वळत राहावे लागते त्याना तो आहार जिकीरीचा होतो हे खरे, कारण इतर सर्व पदार्थ मांसाहारी लोकाकरिता आणि काही पदार्थ मुद्दाम वनस्पत्याहारा- करिता रोज तयार करावे लागल्यास घरगुती खाणावळवाले कंटाळतात. पण हा प्रश्न खर्चाचा आहे. मनुष्य खर्च करण्याच्या स्थितीत असला, विशेषतः त्याला प्रवाशाप्रमाणे कामानिमित्त थोडेच दिवस विलायतेत राहावयाचे असले, तर वन- स्पत्याद्दाराने त्याचे निभण्यासारखे आहे. स्वतः टिळकांची व त्यांच्याबरोबरच्या