पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ ० टिळकांचे चरित्र भाग ४ लँडलीगच्या चळवळीवरूनच सुचलेली होती. राजकीय चळवळीचे एक साधन म्हणून खुनाचा उपयोग करण्याचा पहिला पायंडा रँड साहेबांच्या खुनानेच घाल- ण्यात आला. आणि पुढे या बीजाचा मोठा वृक्ष झाला. टिळक व हे खून यांचेमध्ये प्रत्यक्ष संबंध असल्याचे मात्र कोणास शावित करिता आले नाही. सुधारकांची पीछेहाट झाली व तिचा परिणाम राष्ट्रीय सभेत दिसून आला. मध्य- न्तरी टिळकावर खटला होऊन बाँबगोळ्याचे रहस्य लोकाना पटविल्याबद्दल त्याना शिक्षा झाली. पण बाहेर येताच फिरून त्यानी स्वराज्याची चळवळ सुरू केली. आणि लखनौ येथे ते व विझांटबाई यांची जोडी व्यासपीठावर आली तेव्हा ईश्वराचे अवतार प्रगट झाल्याप्रमाणे लोकानी त्याना उत्थापन व अभि- वादन दिले !"